AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Anurag Kashyap | लैंगिक शोषणाची तक्रार, चौकशीसाठी अनुराग कश्यप वर्सोवा पोलिस स्थानकात  

अभिनेत्री पायल घोषने (Payal Ghosh) दाखल केलेल्या लैंगिक शोषण तक्रारीनंतर अनुरागला मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी समन्स बजावले होते.

Anurag Kashyap | लैंगिक शोषणाची तक्रार, चौकशीसाठी अनुराग कश्यप वर्सोवा पोलिस स्थानकात  
Harshada Bhirvandekar
Harshada Bhirvandekar | Updated on: Oct 01, 2020 | 10:41 AM
Share

मुंबई : पायल घोष प्रकरणी चौकशीसाठी बॉलिवूड चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप (Anurag Kashyap) आज (1 ऑक्टोबर) वर्सोवा पोलिस स्थानकात हजर झाला आहे. अभिनेत्री पायल घोषने (Payal Ghosh) दाखल केलेल्या लैंगिक शोषण तक्रारीनंतर अनुरागला मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी समन्स बजावले होते. अनुराग सकाळी 10 वाजताच्या सुमारास पोलिस स्थानकात दाखल झाला असून, त्याला यासंबंधी प्रश्नोत्तरे केली जाणार आहेत (Payal ghosh Case Anurag Kashyap Reached Versova Police station).

बॉलिवूड अभिनेत्री पायल घोषने दिग्दर्शक अनुराग कश्यप (Anurag Kashyap) विरोधात लैंगिक छळाची तक्रार दाखल केली होती. तक्रार दिल्यानंतरही पोलिसांकडून कोणतीच कारवाई न झाल्याने पायलने (Payal Ghosh) राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान, तिला न्याय मिळेल आणि त्यासाठी आपण सर्वतोपरी मदत करू, असे आश्वासन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी दिले होते.

पायल घोषकडून अनुरागवर आरोप

‘अनुराग कश्यपने माझ्यासोबत गैरवर्तन केले. त्याने मला अत्यंत वाईट पद्धतीची वागणूक दिली. कृपया या व्यक्तीविरोधात काही तरी कारवाई करा. ज्यामुळे या माणसाचे खरे रुप जगासमोर येईल. माझ्या या वक्तव्यामुळे मला धोका होऊन माझ्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कृपया माझी मदत करा’, असे ट्विट पायलने घोषन (Payal Ghosh) काही दिवसांपूर्वी केले होते. यानंतर तिने पंतप्रधान नरेंद्र मोदींना ट्विटमध्ये टॅग करत आपल्याला सुरक्षा पुरवण्याची मागणी केली होती.

रामदास आठवलेंसह पायलने घेतली राज्यपालांची भेट

अभिनेत्री पायल घोषने दिग्दर्शक अनुराग कश्यपवर (Anurag Kashyap) अत्याचार केल्याचे आरोप केले होते. यासंदर्भात पायल घोषने मुंबई पोलिसात तक्रार देखील दाखल केली. मात्र, अनुरागवर कोणतीही कारवाई झाली नसल्याने, रामदास आठवले-पायल घोष यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली होती. त्यानंतर काल (29 सप्टेंबर) रामदास आठवले, पायल घोष यांनी राज्यपाल कोश्यारींची भेट घेतली. (Payal ghosh Case Anurag Kashyap Reached Versova Police station)

‘राज्यपालांशी आम्ही जवळपास अर्धा तास चर्चा केली. पायल घोष यांच्यावर काही वर्षांपूर्वी अत्याचार झाला होता. त्याबाबत तिने ओशिवरा पोलिसात तक्रारही दाखल केली आहे. मात्र, अद्याप अनुराग कश्यपची चौकशी झाली नाही. त्यामुळे मी यासंदर्भात राज्यपालांना निवेदन दिले आहे’, असे रामदास आठवले यांनी सांगितले.

तू माझ्या मुलीसारखी, तुला पूर्ण सुरक्षा मिळेल- राज्यपाल

‘तू माझ्या मुलीसारखी आहेस, तू घाबरु नको, तुला पूर्ण सुरक्षा मिळेल’, असे आश्वासनही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पायलला दिले. तसेच पायलला वाय दर्जाची सुरक्षा देण्यात यावी याबाबतही राज्यपालांशी चर्चा झाली. त्यावर, ‘मी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी याबाबत बोलतो. ते पायलला सुरक्षा देतील’, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सांगितले.

अनुरागने आरोप फेटाळले

‘क्या बात है. मला गप्प करण्यासाठी बराच वेळ घेतलास. काही हरकत नाही. पण मला गप्प करता करता इतके खोटे बोललीस की, स्वत: सोबत अन्य महिलांनादेखील या वादात सामील करून घेतलेस. थोडी तरी मर्यादा बाळगा मॅडम, बास्स इतकेच बोलू शकतो मी. जे काही आरोप केले गेले आहेत ते सगळे अर्थहीन आहेत’, असे ट्विट करत अनुराग कश्यपने (Anurag Kashyap) सगळे आरोप फेटाळून लावले होते.

(Payal ghosh Case Anurag Kashyap Reached Versova Police station)

संबंधित बातम्या : 

Anurag Kashyap | दिग्दर्शक अनुराग कश्यपची चौकशी होणार, पायल घोष प्रकरणी मुंबई पोलिसांचे समन्स

तू माझ्या मुलीसारखी, तुला पूर्ण सुरक्षा मिळेल, राज्यपालांचे पायल घोषला आश्वासन

‘अनेक लग्न करुनही तो संतुष्ट झाला नाही’, कंगनाच्या आरोपांना अनुरागच्या दोन्ही पत्नींकडून प्रत्युत्तर

पायल-अनुराग वादात रामदास आठवलेंची उडी, पायल प्रकरणी गृहमंत्र्यांना पत्र पाठवणार

Follow Us
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त...
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी.....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी......
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद.
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह...
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की.....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की......
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,.
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू.
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश...
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश....
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर...
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर....
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री...
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री....