तू माझ्या मुलीसारखी, तुला पूर्ण सुरक्षा मिळेल, राज्यपालांचे पायल घोषला आश्वासन

रामदास आठवले, पायल घोष आणि भगतसिंह कोश्यारी यांनी जवळपास अर्धा पाऊण तास चर्चा केली. (Ramdas Athawale, Payal Ghosh meet Governor Bhagat Singh Koshyari)

तू माझ्या मुलीसारखी, तुला पूर्ण सुरक्षा मिळेल, राज्यपालांचे पायल घोषला आश्वासन

मुंबई : रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि अभिनेत्री पायल घोष यांनी नुकतंच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. रामदास आठवले, पायल घोष आणि भगतसिंह कोश्यारी यांनी जवळपास अर्धा पाऊण तास चर्चा केली. यावेळी रामदास आठवले यांनी पायल घोषला सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी राज्यपालांकडे केली. त्यावर राज्यपालांनी मी याबाबत गृहमंत्र्यांशी बोलतो, असे सांगितले. (Ramdas Athawale, Payal Ghosh meet Governor Bhagat Singh Koshyari)

अभिनेत्री पायल घोषने दिग्दर्शक अनुराग कश्यपवर अत्याचार केल्याचे आरोप केले होते. यासंदर्भात पायल घोषने मुंबई पोलिसात तक्रार देखील दाखल केली. मात्र, अनुरागवर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. याबाबत रामदास आठवले-पायल घोष यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली होती. त्यानंतर आज (29 सप्टेंबर) रामदास आठवले, पायल घोष यांनी राज्यपाल कोश्यारींची भेट घेतली.

“राज्यपालांशी आम्ही जवळपास अर्धा तास चर्चा केली. पायल घोष यांच्यावर काही वर्षांपूर्वी अत्याचार झाला होता. त्याबाबत तिने ओशिवरा पोलिसात तक्रारही दाखल केली आहे. मात्र, अद्याप अनुराग कश्यपची चौकशी झाली नाही. त्यामुळे मी यासंदर्भात राज्यपालांना निवेदन दिले आहे,” असे रामदास आठवले यांनी सांगितले.

तसेच पायलला वाय दर्जाची सुरक्षा देण्यात यावी याबाबतही राज्यपालांशी चर्चा झाली. त्यावेळी राज्यपाल म्हणाले, “मी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी याबाबत बोलतो. ते पायलला सुरक्षा देतील,” असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सांगितले.

“तू माझ्या मुलीसारखी, तुला पूर्ण सुरक्षा मिळेल- राज्यपाल” 

“तू माझ्या मुलीसारखी आहेस, तू घाबरु नको, तुला पूर्ण सुरक्षा मिळेल,” असे आश्वासनही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पायलला दिले.

पायल घोषकडून अनुरागवर आरोप

“अनुराग कश्यपने माझ्यासोबत गैरवर्तन केलं. त्याने मला अत्यंत वाईट पद्धतीची वागणूक दिली. कृपया या व्यक्तीविरोधात काही तरी कारवाई करा. ज्यामुळे या माणसाचं खरं रुप जगासमोर येईल. माझ्या या वक्तव्यामुळे मला धोका होऊन माझ्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कृपया माझी मदत करा”, असं ट्विट पायलने घोषन काही दिवसांपूर्वी केलं होतं. यानंतर तिने पंतप्रधान नरेंद्र मोदींना ट्विटमध्ये टॅग करत आपल्याला सुरक्षा पुरवण्याची मागणी केली होती.

अनुरागने आरोप फेटाळले 

“क्या बात है. मला गप्प करण्यासाठी बराच वेळ घेतलास. काही हरकत नाही. पण मला गप्प करता करता इतकं खोटं बोललीस की स्वत: सोबत अन्य महिलांनादेखील या वादात घेतलंस. थोडी तरी मर्यादा बाळगा मॅडम, बास्स इतकंच बोलू शकतो मी. जे काही आरोप केले आहेत ते सगळे अर्थहीन आहेत”, असं ट्विट अनुराग कश्यपने तिच्या ट्विटनंतर केलं आहे. (Ramdas Athawale, Payal Ghosh meet Governor Bhagat Singh Koshyari)

संबंधित बातम्या : 

‘अनेक लग्न करुनही तो संतुष्ट झाला नाही’, कंगनाच्या आरोपांना अनुरागच्या दोन्ही पत्नींकडून प्रत्युत्तर

पायल-अनुराग वादात रामदास आठवलेंची उडी, पायल प्रकरणी गृहमंत्र्यांना पत्र पाठवणार

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *