AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाहेर 200 अफेअर्स.., वडील महेश भट्ट यांच्या दुसऱ्या लग्नाबद्दल पूजा भट्ट स्पष्टच म्हणाली..

अभिनेत्री पूजा भट्ट नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या वडिलांबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली. महेश भट्ट आणि सोनी राजदान यांच्या नात्याबद्दल आणि वडिलांच्या दुसऱ्या लग्नाबद्दल पूजा नेमकं काय म्हणाली, ते वाचा..

बाहेर 200 अफेअर्स.., वडील महेश भट्ट यांच्या दुसऱ्या लग्नाबद्दल पूजा भट्ट स्पष्टच म्हणाली..
पूजा भट्ट, महेश भट्ट आणि सोनी राजदानImage Credit source: Instagram
| Updated on: May 29, 2026 | 2:05 PM
Share

अभिनेत्री पूजा भट्ट अनेकदा तिच्या कौटुंबिक नात्यांमुळे चर्चेत आली. पूजाचे वडील आणि प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट यांनी दोनदा लग्न केलं. पूजा ही किरण भट्ट आणि महेश भट्ट यांची मुलगी आहे. तर महेश भट्ट यांनी सोनी राजदान यांच्याशी दुसरं लग्न केलं. सोनी आणि महेश यांना आलिया भट्ट आणि शाहीन भट्ट या दोन मुली आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पूजा तिच्या वडिलांच्या दुसऱ्या लग्नाविषयी आणि कौटुंबिक नातेसंबंधांविषयी मोकळेपणे व्यक्त झाली.

विक्की लालवानीला दिलेल्या मुलाखतीत पूजा म्हणाली, “मला असे वडील हवे आहेत का, जे आपण एक सर्वसामान्य माणूस आहोत, आपलं प्रेम बदललं आहे, ही गोष्ट स्वीकारतील आणि त्यांच्या नवीन प्रेयसीला पाठिंबा देण्यासाठी घरातून बाहेर पडतील? की मला असे वडील हवे आहेत, जे समाजासाठी माझ्या आईसोबत एकाच छताखाली राहतील. बाहेर 200 अफेअर्स करतील, पण घरात मात्र सगळं ‘सगळं ठीक आहे’ असा दिखावा करून शांत राहतील? ते पुरुष असल्याने असं करू शकतात, हे माझ्या घरात कधीच झालं नाही. दोघांनाही वाटलं होतं की हे नातं संपुष्टात आलं आहे.”

पूजाने पुढे सांगितलं की, सोनी राजदान आणि महेश भट्ट यांचं प्रेमप्रकरण सुरू होण्यापूर्वीही त्या अनेकदा घरी ये-जा करायच्या. कारण त्यावेळी दोघं ‘सारांश’ या चित्रपटावर काम करत होते. “जेव्हा ते दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांचं नातं बहरलं, तेव्हा माझ्या वडिलांनी ते लपवण्याऐवजी त्याला नाव देऊन सर्वांसमोर आणण्याचा निर्णय घेतला. एके रात्री त्यांनी मला उठवून सांगितलं की ते सोनीवर प्रेम करतात आणि तिच्यासोबत नव्याने संसार थाटणार आहेत. त्यांनी मला सांगितलं की वाईट वाटून घेऊ नकोस, कारण मी तुला कधीही सोडून जाणार नाही”, असा खुलासा पूजा भट्टने केला.

महेश भट्ट यांनी 1986 मध्ये सोनी राजदानशी दुसरं लग्न केलं. पण पहिल्या पत्नीला घटस्फोट द्यावा लागू नये म्हणून त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला होता. याविषयी प्रश्न विचारला असता पूजा म्हणाली, “मला माझ्या वडिलांबद्दल एक गोष्ट माहीत आहे की, एकदा का त्यांनी कोणाचा हात हातात घेतला, मग ती कोणतीही व्यक्ती असो, ते त्यांना कधीच सोडत नाही. ही गोष्ट त्यांच्या आयुष्यातील सर्व स्त्रियांना, त्यांच्यासोबत काम केलेल्या लोकांना आणि ज्यांना त्यांनी घडवून पुढे आणलं आहे, त्या सर्वांना लागू होते. ते नेहमीच सोबत असतात. ते विश्वासार्ह आहेत. नातेसंबंधांचा शेवट चांगला होत नाही. पुन्हा तसं होईल या विचाराने माझ्या आईला होणारी वेदना मी पाहिली आहे. त्यांनी नेहमीच एकमेकांशी प्रतिष्ठ आणि सभ्यता जपली आहे. त्यांनी कधीच मुलांना एकमेकांशी भांडायला लावलं नाही. जेव्हा शाहीनचा जन्म झाला, तेव्हा माझ्या वडिलांनी सर्वांत पहिला फोन माझ्या आईलाच केला होता. तो क्षण मी कधीच विसरणार नाही, जेव्हा माझी आई माझ्याजवळ आली आणि म्हणाली, आता तुला एक बहीण आहे.”

“आलिया आणि शाहीन दोघीही माझ्या डोळ्यांसमोरच मोठ्या झाल्या आहेत. कदाचित आम्ही एकमेकांसोबत फार वेळ घालवला नसेल, कारण प्रत्येकाचं वैयक्तिक आयुष्य आहे. पण ख्रिसमस आणि वाढदिवशी आम्ही आवर्जून भेटतो. गरजेच्या वेळी आम्ही एकमेकांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहतो”, अशा शब्दांत पूजा भट्ट व्यक्त झाली.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल