महाकुंभमध्ये पवित्र स्नान केल्यानंतर पूनम पांडे म्हणाली, “माझे सर्व पाप..”

आपल्या बोल्ड अंदाजामुळे सतत चर्चेत असलेली अभिनेत्री पूनम पांडे प्रयागराजला महाकुंभमेळ्यात पोहोचली असून तिथे तिने पवित्र स्नानसुद्धा केलंय. याचे फोटो आणि व्हिडीओ तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

महाकुंभमध्ये पवित्र स्नान केल्यानंतर पूनम पांडे म्हणाली, माझे सर्व पाप..
oonam Pandey
Image Credit source: Instagram
| Updated on: Jan 30, 2025 | 10:52 AM

तब्बल 144 वर्षांनी होणाऱ्या महाकुंभमध्ये पवित्र स्नान करण्यासाठी दररोज असंख्य भाविक प्रयागराजला पोहोचत आहेत. बुधवारी मौनी अमावस्येच्या निमित्ताने जवळपास आठ ते दहा कोटी भाविकांनी संगममध्ये पवित्र स्नान केलं. उत्तर प्रदेशातील प्रयागराज याठिकाणी महाकुंभ होत असून संगममध्ये स्नान केल्याने आपले सर्व पाप धुतले जातात, असं म्हटलं जातं. आतापर्यंत सर्वसामान्यांसह अनेक सेलिब्रिटींनीही या पवित्र स्नानाचा अनुभव घेतला. भाजप खासदार आणि अभिनेत्री हेमा मालिनी, दिग्दर्शक कबीर खान, कॉमेडियन सुनील ग्रोवर, कोरिओग्राफर रेमो डिसूझा, मराठी दिग्दर्शक प्रवीण तरडे यांसारख्या सेलिब्रिटींनी प्रयागराजमध्ये पवित्र स्नान केलंय. त्यातच आता अभिनेत्री पूनम पांडेचाही समावेश झाला आहे.

आपल्या बोल्ड अंदाजामुळे सतत चर्चेत असलेली पूनम नुकतीच प्रयागराजला गेली होती. पूनमने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली. संगममध्ये डुबकी घेतानाचे फोटो तिने इन्स्टा स्टोरीमध्ये शेअर केले आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलंय, ‘माझे सर्व पाप धुतले गेले.’ यावरून अनेकांनी तिला ट्रोलसुद्धा केलंय. पूनम तिच्या बोल्ड अंदाजामुळे, बोल्ड व्हिडीओंमुळे आणि अनेकदा काही कॉन्ट्रोव्हर्सींमुळेही चर्चेत असते. त्यामुळे महाकुंभमध्ये पवित्र स्नान केल्याचे तिचे फोटो पाहून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. ‘सौ चुहें खाकर बिल्ली चली हज को’, अशी हिंदीतली म्हण एका युजरने लिहिली आहे. तर ‘पूनम पांडेसुद्धा पापमुक्त झाली. आता फक्त आपण पापी राहिलो आहोत’, असं दुसऱ्याने म्हटलंय.

बुधवारी महाकुंभमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेवरही यावेळी पूनमने प्रतिक्रिया दिली. “ही अत्यंत दुर्दैवी घटना होती. शक्ती भले कमी झाली तरी चालेल, पण श्रद्धा कमी झाली नाही पाहिजे. ओम नम: शिवाय”, असं ती म्हणाली. प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या कुंभमेळ्याला बुधवारी चेंगराचेंगरीचं गालबोल लागलं. मौनी अमावस्येसाठी संगमावर प्रचंड गर्दी झालेली असताना मध्यरात्रीनंतर दोनच्या सुमारास चेंगराचेंगरी झाली. यात 30 जणांचा मृत्यू झाला असून 60 जण जखमी झाल्याची माहिती उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालक वैभव कृष्णा यांनी दिली.