
पाकिस्तान सरकारनं दोनवेळा टिकटॉकवर बंदी घातली आणि हे अॅप परत सुरू सुद्धा केलं. पाकिस्तान टेलिकम्युनिकेशन ऑथॉरिटीनं या अॅपमधील कन्टेटवर सेन्सॉर टाकण्याचा एक नवीन मार्ग शोधला आहे. ज्यामध्ये एखाद्याच्या अकाऊंटवर वैयक्तिकरित्या बंदी घातली जाते. पीटीएच्या वतीनं मिया खलिफाच्या खात्यावर पाकिस्तानमध्ये बंदी घालण्यात आली आहे.

पीटीएने कोणतीही अधिकृत घोषणा न करता मिया खलिफाच्या खात्यावर बंदी घातली. हे का केलं गेलं याचं कारण सांगण्यात आलं नाही.

मिया खलिफाच्या चाहत्यांना तिचा कंन्टेट पाकिस्तानमध्ये पाहायला मिळाला नाही तेव्हा त्यांनी ट्विटरवर हा मुद्दा उपस्थित केला. मिया खलिफाला याबाबत माहिती मिळताच तिला धक्का बसला.

मात्र मिया खलिफानं पीटीएच्या या बंदीकडे लक्ष दिलं नाही. तिनं आपल्या एका ट्विटमध्ये जे म्हटले ते पाकिस्तानमधील तिच्या चाहत्यांना दिलासा देणारं आहे.

मिया खलिफानं ट्विटमध्ये म्हटलं की, मी आतापासूनच ट्विटरवर माझे सर्व टिकटॉक व्हिडीओ पोस्ट करत आहे. हे माझ्या पाकिस्तानी चाहत्यांसाठी आहे.