Adipurush | पोस्ट शेअर करत लोकांनी उडवली आदिपुरुषची खिल्ली, थेट केली ‘या’ चित्रपटासोबत तुलना

आदिपुरुष हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. आदिपुरुष चित्रपट मोठ्या वादात सापडला होता. शेवटी हा चित्रपट आज रिलीज झालाय. आदिपुरुष चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये एक मोठी क्रेझ सुरूवातीला बघायला मिळाली. मात्र, सतत चित्रपटावर टीका होताना दिसत आहे.

Adipurush | पोस्ट शेअर करत लोकांनी उडवली आदिपुरुषची खिल्ली, थेट केली या चित्रपटासोबत तुलना
| Updated on: Jun 16, 2023 | 4:12 PM

मुंबई : प्रभास याचा बहुचर्चित चित्रपट आदिपुरुष (Adipurush) हा आजच रिलीज झालाय. आदिपुरुष हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असलेला चित्रपट आहे. आदिपुरुष हा चित्रपट नेटकऱ्यांच्या सतत निशाण्यावर होता. या चित्रपटामध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. साऊथ स्टार प्रभास आणि बाॅलिवूड (Bollywood) अभिनेत्री कृति सेनन या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटात बाॅलिवूड अभिनेता सैफ अली खान हा देखील मुख्य भूमिकेत असून तो रावणाच्या भूमिकेत आहे. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना कृति सेनन आणि प्रभास हे दिसले. मात्र, सैफ अली खान( Saif Ali Khan) याने वादापासून वाचण्यासाठी या चित्रपटाचे अजिबातच प्रमोशन केले नाहीये.

आदिपुरुष या चित्रपटाकडून निर्मात्यांना प्रचंड अशा अपेक्षा या बघायला मिळत आहेत. आदिपुरुष हा अत्यंत बिग बजेटचा चित्रपट आहे. 500 कोटींच्या बजेटमध्ये चित्रपट तयार करण्यात आलाय. विशेष म्हणजे शाहरूख खान याच्या पठाण चित्रपटाला कमाईमध्ये आदिपुरुष हा चित्रपट मागे टाकणार असल्याची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.

आदिपुरुष चित्रपटाचे ओपनिंगही जबरदस्त झाल्याचे अनेक रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय. आदिपुरुष काय धमाका बाॅक्स आॅफिसवर करत आहे, याचे आकडे पुढे येतीलच. मात्र, त्या पूर्वी सोशल मीडियावर आदिपुरुष चित्रपटाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. अनेकांनी चित्रपट पाहून अनेक कमी या चित्रपटामध्ये काढल्या आहेत.

अनेकांनी आदिपुरुष हा चित्रपट बघून आल्यानंतर प्रभासच्या अभिनयाचे काैतुक केले तर अनेकांनी VFX ची खिल्ली उडवल्याचे बघायला मिळत आहे. बऱ्याच लोकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत थेट आदिपुरुष चित्रपटाच्या विरोधात पोस्ट केल्याचे बघायला मिळत आहे. आता या पोस्ट सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत.

चित्रपटातील हनुमानाचे डायलॉग अनेकांच्या पचनी पडले नसल्याचे बघायला मिळत आहे तर दुसरीकडे काही लोकांनी चित्रपट पाहून चित्रपटावर टिका करण्यासही सुरूवात केली आहे. चित्रपट रिलीज झाल्यानंतरही आदिपुरुष चित्रपटाचा वाद काही कमी होताना दिसत नाहीये. अनेकांनी या चित्रपटावर जाहिर टीका केल्याचे बघायला मिळत आहे. अनेकांनी थेट म्हटले आहे की, याच्यापेक्षा चांगला चित्रपट KRK तयार करू शकतो.