AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Prabhas | लग्नाविषयी प्रभासचा मोठा खुलासा; विवाहस्थळाविषयी दिली महत्त्वपूर्ण माहिती

‘आदिपुरुष’च्या शूटिंगदरम्यान प्रभास आणि क्रितीची चांगली मैत्री झाली आणि याच मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं, अशी चर्चा आहे. ‘भेडिया’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान क्रितीला यासंदर्भात प्रश्न विचारला गेला होता. त्याचं उत्तर देताना तिने प्रभासशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. 

Prabhas | लग्नाविषयी प्रभासचा मोठा खुलासा; विवाहस्थळाविषयी दिली महत्त्वपूर्ण माहिती
Prabhas and Kriti SanonImage Credit source: Instagram
| Updated on: Jun 07, 2023 | 10:43 AM
Share

आंध्रप्रदेश : दिग्दर्शक ओम राऊत यांचा ‘आदिपुरुष’ हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. मंगळवारी या चित्रपटाचा आणखी एक ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला. यावेळी कार्यक्रमाला चाहत्यांची मोठी गर्दी पहायला मिळाली. तिरुपती बालाजी मंदिराजवळ हा ट्रेलर लाँचचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात साऊथ सुपरस्टार प्रभासला त्याच्या लग्नाविषयी प्रश्न विचारला गेला. त्यावर त्याने दिलेलं उत्तर सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. आदिपुरुष या चित्रपटात प्रभास, क्रिती सनॉन, सैफ अली खान, सनी सिंग आणि देवदत्त नागे यांच्या मुख्य भूमिका आहेत.

गेल्या काही दिवसांपासून प्रभासचं नाव अभिनेत्री क्रिती सनॉनशी जोडलं जात आहे. हे दोघं एकमेकांना डेट करत असून लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचं म्हटलं जात आहे. या चर्चांच्या पार्श्वभूमीवर आदिपुरुषच्या ट्रेलर लाँचच्या कार्यक्रमात प्रभासला त्याच्या लग्नाविषयी प्रश्न विचारण्यात आला. प्रभासने याआधी त्याच्या लग्नाविषयी कधी प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र पहिल्यांदाच त्याने त्यावर मौन सोडलं आहे. इतकंच नव्हे तर त्याने लग्नाचं स्थळसुद्धा जाहीर केलं आहे.

‘बाहुबली’ फेम प्रभासचं नाव याआधी दाक्षिणात्य अभिनेत्री अनुष्का शेट्टीसोबत जोडण्यात आलं होतं. ‘बाहुबली’मधील ही जोडी तुफान चर्चेत होती. मात्र अनुष्काने वेळोवेळी डेटिंगच्या चर्चा नाकारल्या आहेत. प्रभास आणि मी फक्त चांगले मित्र आहोत, असं तिने स्पष्ट केलं होतं. आता लग्नाविषयी प्रश्न विचारताच प्रभास म्हणाला, “मी इथेच तिरुपतीमध्ये लग्न करणार आहे.” त्याचं हे उत्तर ऐकून चाहत्यांनी एकच जल्लोष केला. आदिपुरुष हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रभास त्याच्या लग्नाची घोषणा करू शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

View this post on Instagram

A post shared by Prabhas (@actorprabhas)

‘आदिपुरुष’च्या शूटिंगदरम्यान प्रभास आणि क्रितीची चांगली मैत्री झाली आणि याच मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं, अशी चर्चा आहे. ‘भेडिया’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान क्रितीला यासंदर्भात प्रश्न विचारला गेला होता. त्याचं उत्तर देताना तिने प्रभासशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. ‘टायगर श्रॉफ, प्रभास आणि कार्तिक आर्यन या तिघांपैकी तू कोणासोबत फ्लर्ट, डेट आणि लग्न करू इच्छितेस’, असा प्रश्न क्रितीला एका मुलाखतीत विचारला गेला. त्यावर उत्तर देताना ती म्हणाली होती, “कार्तिक आर्यनसोबत फ्लर्ट करेन, टायगरला डेट करेन आणि प्रभासशी लग्न करेन.” इतकंच नव्हे तर ऑनस्क्रीन आम्ही दोघं खूप चांगले दिसतो, असंही ती म्हणाली होती.

Follow Us
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालय...
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालयाचा मोठा निर्णय
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत...
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत दौरा, CM फडणवीस देखील ब्रिक्स परिषदेसाठी रवाना
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले...
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले स्वागत
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन; आणीबाणीच्या काळात...
मुंबईतील मराठा आंदोलनाबाबत मोठी अपडेट; मनोज जरांगेंना कोर्टाचा दणका
मुंबईतील मराठा आंदोलनाबाबत मोठी अपडेट; मनोज जरांगेंना कोर्टाचा दणका
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल