AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pradeep Rawat : ‘गजिनी’ फेम प्रदीप रावत यांच्या निधनाचं कारण काय? मॅनेजरने केलं स्पष्ट

Pradeep Rawat's Death Reason: 'गजिनी', 'लगान' यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारलेले अभिनेते प्रदीप रावत यांचं मंगळवारी निधन झालं. त्यांच्या मॅनेजरने त्यांच्या निधनाचं कारण सांगितलं आहे. गेल्या काही काळापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.

Pradeep Rawat : 'गजिनी' फेम प्रदीप रावत यांच्या निधनाचं कारण काय? मॅनेजरने केलं स्पष्ट
Pradeep RawatImage Credit source: Instagram
| Updated on: Aug 05, 2026 | 11:04 AM
Share

‘लगान’, ‘गजिनी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये अविस्मरणीय भूमिका साकारलेले अभिनेते प्रदीप रावत यांचं निधन झालं. ते 74 वर्षांचे होते. अभिनेते यशपाल शर्मा यांनी त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला. प्रदीप यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा विक्रमादित्य असा परिवार आहे. गेल्या काही काळापासून ते आजारी होते. त्यांचे मॅनेजर सिद्धार्थ तिवारी यांनी त्यांच्या निधनाचं कारण स्पष्ट केलं आहे. “चार वर्षांपूर्वी प्रदीप यांना रक्ताच्या कॅन्सरचं निदान झालं होतं. त्यातून ते बरेसुद्धा झाले होते. मात्र दीड महिन्यापूर्वी त्यांना पुन्हा कॅन्सर झाला”, असं तिवारी यांनी सांगितलं. त्यांच्यावर भिवंडीच्या कर्करोग रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यापूर्वी ते मुंबईच्या कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात दाखल होते. प्रदीप यांच्या निधनाने संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.

प्रदीप रावत यांच्या पार्थिवावर आज (बुधवार) अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांचं पार्थिव दुपारी 2 ते 4 वाजेपर्यंत मुंबईतील गोरेगाव पश्चिम इथल्या इम्पिरियल हाइट्स इथं अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. तर संध्याकाळी 4 वाजता त्यांचं पार्थिव जोगेश्वरी पश्चिम इथल्या ओशिवारा स्मशानभूमीत नेण्यात येणार आहे. तिथं शासकीय सन्मानासह त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

प्रदीप यांनी हिंदी, तेलुगू, तमिळ, कन्नड आणि बंगाली चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ‘सरफरोश’, ‘अग्निपथ’ आणि ‘लगान’मधील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरल्या होत्या. 2005 मध्ये प्रदर्शित झालेल्या तमिळ चित्रपट ‘गजिनी’मध्ये दुहेरी भूमिका साकारून ते सुपरस्टार झाले. याच चित्रपटाचा हिंदी रिमेक 2008 मध्ये आला होता. त्यातही त्यांनी आमिर खानसोबत काम केलं. तेलुगू चित्रपट ‘स्ये’साठी त्यांना सर्वोत्कृष्ट खलनायकाचा फिल्मफेअर पुरस्कार, नंदी अवॉर्ड आणि संतोषम अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं. चार दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी 200 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं.

प्रदीप रावत यांचे जुने मित्र आणि ‘लगान’मधील सहकलाकार यशपाल शर्मा यांनी सोशल मीडियावरून श्रद्धांजली वाहिली आहे. अभिनेते गजेंद्र चौहान यांनीही प्रदीप रावत यांना श्रद्धांजली वाहिली. प्रदीप यांनी हिंदी चित्रपटांबरोबरच तेलुगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळी चित्रपटांमध्येही विविध भूमिका साकारल्या आहेत.

Follow Us
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक अवस्था अभिजीत दीपकेकडून उघड
भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया,
Narendra Pawar : भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्याच्या दरे गावी जाणार, नेमकं
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्यातील दरे'गावी जाणार, नेमकं कारण काय?
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध...
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध राज्यांमध्ये दीपोत्सव, विशेष प्रार्थना
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा...
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा पलटवार!
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या...
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या देखाव्याने वेधलं लक्ष
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं..
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं वक्तव्य
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खं...
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खंच्या आख्खं 80s चं दशक....
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना...उद्धव ठाकरेंची मोठी प्रतिक्रिया
मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना... उद्धव ठाकरेंनी अखेर भूमिका मांडली
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र...
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र अगामी सुनावणी थेट...