AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Prahaar Box Office Collection : ललित प्रभाकरच्या ‘प्रहार’ची परिस्थिती बिकट, प्रेक्षकांनी पाठ फिरवल्यामुळे मोठे नुकसान? 9व्या दिवशी…

अभिनेता ललित प्रभाकर आणि राजकुमार राव चा 'प्रहार - द उज्वल निकम स्टोरी' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपेक्षित कामगिरी करण्यात अपयशी ठरताना दिसत आहे. चित्रपटाचा विषय आणि कलाकारांची फळी पाहता चांगल्या कमाईची अपेक्षा होती. मात्र पहिल्या आठवड्यापासून चित्रपटाचा वेग मंदावला आणि बॉक्स ऑफिसवर त्याची कामगिरी निराशाजनक ठरली.

Prahaar Box Office Collection  : ललित प्रभाकरच्या 'प्रहार'ची परिस्थिती बिकट, प्रेक्षकांनी पाठ फिरवल्यामुळे मोठे नुकसान? 9व्या दिवशी...
lallit prabhakar prahaar Image Credit source: SOCIAL MEDIA
| Updated on: Oct 24, 2026 | 5:37 PM
Share

अभिनेता ललित प्रभाकर आणि राजकुमार राव चा ‘प्रहार – द उज्वल निकम स्टोरी’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपेक्षित कामगिरी करण्यात अपयशी ठरताना दिसत आहे. चित्रपटाचा विषय आणि कलाकारांची फळी पाहता चांगल्या कमाईची अपेक्षा होती. मात्र पहिल्या आठवड्यापासून चित्रपटाचा वेग मंदावला आणि बॉक्स ऑफिसवर त्याची कामगिरी निराशाजनक ठरली.

मूव्ही टॉकीजच्या वृत्तानुसार चित्रपटाने पहिल्या सहा दिवसांत अंदाजे 15.25 कोटी रूपयांची कमाई केली होती. गुरूवारच्या कमाईनंतर सात दिवसांची एकूण कमाई 16.65 कोटी रूपयांपर्यंत पोहोचल्याचं नमूद करण्यात आलं आहे.

‘प्रहार’ ने 16 ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहांत प्रवेश केला. पहिल्या दिवशी चित्रपटाने सुमारे 2 कोटी रूपये कमावले. त्यानंतर शनिवार आणि रविवारी कमाईत वाढ झाली. मात्र आठवड्याच्या सुरूवातीला चित्रपटाला ही गती कायम ठेवता आली नाही.मंगळवारी काहीशी वाढ दिसली,पण बुधवार आणि गुरूवारी कमाई पुन्हा घसरली.

या चित्रपटांत राजकुमार राव यांनी ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची भूमिका साकारली आहे. अविनाश अरूण यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून वामिका गब्बी, जयदीप अहलावत, ललित प्रभाकर आणि सिकंदर खेर हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत. 1993 मधील मुंबई बॉबस्फोट आणि 26 नोव्हेंबर 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याशी संबंधित कायदेशीर लढ्यांच्या पार्श्वभूमीवर चित्रपटाची कथा पुढे जाते.

मू्व्ही टॉकिजच्या अंदाजानुसार, चित्रपटाची एकूण कमाई सुमारे 25 कोटी रूपयांपर्यंत पोहोचू शकते. मात्र पहिल्या आठवड्यातील मंदावलेली कमाई पाहता चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर यश मिळवणं कठीण ठरू शकतं. अंतिम कमाई मात्र पुढील दिवसांत प्रेक्षकांचा प्रतिसाद आणि चित्रपटगृहातील कामगिरीवर अवलंबून असेल.

Follow Us
रामदास कदमांना एकनाथ शिंदेंचा फोन? माध्यमांशी बोलणं टाळा... - सूत्र
Eknath Shinde : रामदास कदमांना एकनाथ शिंदेंचा फोन? माध्यमांशी बोलणं टाळा; महायुतीतील वादावर पडदा टाकण्याचे प्रयत्न - सूत्र
पालिकेत पाणी कपातीवरून भाजप-शिवसेनेत जोरदार खडाजंगी
Navi Mumbai Water Crisis : पालिकेत पाणी कपातीवरून भाजप-शिवसेनेत जोरदार खडाजंगी
सुशील कुलकर्णीचा माज की उदयनराजेंची अवहेलना? अंधारेंचा सवाल
Sushma Andhare : सुशील कुलकर्णीचा माज की उदयनराजेंची अवहेलना? अंधारेंचा सवाल
32 मिनिटांची क्लिप पुन्हा पुन्हा ऐकली; भास्कर जाधवांचा मोठा दावा....
Bhaskar Jadhav : 32 मिनिटांची क्लिप पुन्हा पुन्हा ऐकली; भास्कर जाधवांचा मोठा दावा, पुढे म्हणाले....
जरांगेंना जो प्रश्न पडलाय, तोच मलाही..; श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया
Shrikant Shinde On Jarange Patil : जरांगेंना जो प्रश्न पडलाय, तोच मलाही..; श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया आली समोर, पुढे म्हणाले...
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया....
Shirkant Shinde On Audio Clip : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
आंदोलन काही दिवस पुढे ढकललं तरी चालेल, पण…; जरांगेंनी सांगितली मराठा..
Manoj Jarange On Maratha : आंदोलन काही दिवस पुढे ढकललं तरी चालेल, पण…; मनोज जरांगेंनी सांगितली मराठा आरक्षण आंदोलनाची रणनीती
या क्लिपचे रायटर, क्रिएटर... प्रसाद लाड यांनी नावच सांगून टाकलं
Prasad Lad On Viral Audio Clip : या क्लिपचे रायटर, क्रिएटर... प्रसाद लाड यांनी नावच सांगून टाकलं
ठाण्यातील निवासी भागातून AI डेटा सेंटर हटवा; आदित्य ठाकरेंचं...
Aditya Thackeray : ठाण्यातील निवासी भागातून AI डेटा सेंटर हटवा; आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
मोठं षडयंत्र उघड झालं, आता दोघेही माझ्या मागे लागतील; जरांगेंचा दावा
Manoj Jarange Patil : मोठं षडयंत्र उघड झालं, आता दोघेही माझ्या मागे लागतील; मनोज जरांगेंचा मोठा दावा, पुढे म्हणाले...