‘मॅरेज रजिस्ट्रेशन’ नाही तर प्राजक्ता माळीने कोणत्या कागदपत्रांवर केली सही? अखेर झाला उलगडा

अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या एका फोटोची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा झाली. तिने काही कागदपत्रांवर स्वाक्षरी करतानाचा फोटो पोस्ट केला होता. ही कागदपत्रं कोणती होती, याचा खुलासा अखेर झाला आहे.

'मॅरेज रजिस्ट्रेशन' नाही तर प्राजक्ता माळीने कोणत्या कागदपत्रांवर केली सही? अखेर झाला उलगडा
प्राजक्ता माळीImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 10, 2024 | 1:51 PM

मराठी कलाविश्वातील सर्वांत लोकप्रिय आणि सतत चर्चेत असलेली अभिनेत्री प्राजक्ता माळीने गुरुवारी सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करून सर्वांचं लक्ष वेधलं होतं. ’23 एप्रिल रोजी सर्वांत आवडत्या आणि बहुप्रतिक्षित कागरपत्रांवर स्वाक्षरी केली. अर्थात हे मॅरेज रजिस्ट्रेशन नाही’, असं लिहित तिने काही कागदपत्रांवर सही करतानाचा फोटो पोस्ट केला होता. प्राजक्ताने नेमक्या कोणत्या कागदपत्रांवर सही केली होती, याचा उलगडा अखेर झाला आहे. प्राजक्ताची निर्मिती असलेल्या नव्या चित्रपटाची घोषणा तिने आज (शुक्रवार) केली आहे. मनोरंजन विश्वात स्वतःचं वेगळं स्थान असणारं पॅनोरमा स्टुडिओज आणि प्राजक्ता माळी हे संयुक्त विद्यमाने ‘फुलवंती’ ही भव्य कलाकृती घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.

ही पॅनोरमा स्टुडिओजची आजवरची सर्वात मोठी मराठी चित्रपट निर्मिती ठरणार असून प्राजक्ता यानिमित्ताने चित्रपट निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे. या चित्रपटाचं लेखन-संवाद प्रविण विठ्ठल तरडे यांचं असून दिग्दर्शन स्नेहल प्रविण तरडे करत आहे. पखवाज आणि घुंगरांच्या जुगलबंदीचं ‘फुलवंती’ चित्रपटाचं लक्षवेधी पोस्टर अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालं आहे. कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, मंगेश पवार, श्वेता माळी आणि प्राजक्ता माळी चित्रपटाचे निर्माते आहेत. प्रसिद्ध छायाचित्रणकार महेश लिमये यांनी छायाचित्रणाची तर संगीताची जबाबदारी अविनाश-विश्वजीत यांनी सांभाळली आहे.

हे सुद्धा वाचा

आपल्या या नव्या प्रवासाबद्दल बोलताना प्राजक्ता म्हणाली, ‘फुलवंती’सारखी दर्जेदार साहित्यकृती माझ्याकडे आल्याने मी निर्माती म्हणून एक भव्य कलाकृती करण्यास तयार झाले. यासाठी पॅनोरमा स्टुडिओजने मला भक्क्कम पाठिंबा दिला, त्यातून माझा आत्मविश्वास उंचावला. ‘फुलवंती’ चित्रपटाच्या माध्यमातून रसिकांना उत्तम कलाकृती देऊ शकेन, असा विश्वास मला आहे.” ‘फुलवंती’ ही शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेली अलौकिक कलाकृती आहे. ही अजरामर कलाकृती आता चित्रपट रूपाने मराठी रुपेरी पडद्यावर अवतरणार आहे.

प्राजक्ताने या चित्रपटाची घोषणा करताच त्यावर चाहत्यांकडून आणि कलाविश्वातील विविध सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला आहे. अभिनेत्री अमृता खानविलकर, मुक्ता बर्वे, आरोह वेलणकर, ऋतुजा बागवे यांसारख्या कलाकारांनी प्राजक्ताला तिच्या नव्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Non Stop LIVE Update
निवडणूक आयोगाचा वापर घरगड्या सारखा..उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात
निवडणूक आयोगाचा वापर घरगड्या सारखा..उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात.
ऐ थांब जरा.... राज ठाकरे चिडले अन् माध्यमांवर भडकले, पण का?
ऐ थांब जरा.... राज ठाकरे चिडले अन् माध्यमांवर भडकले, पण का?.
मतदान करायला आले अन EVM कक्षाला घातला हार, शांतीगिरी महाराजांना भोवलं
मतदान करायला आले अन EVM कक्षाला घातला हार, शांतीगिरी महाराजांना भोवलं.
हे अत्यंत वाईट...आदेश बांदेकर मतदान करण्यासाठी आले अन् भडकले
हे अत्यंत वाईट...आदेश बांदेकर मतदान करण्यासाठी आले अन् भडकले.
राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबण घेतायत, ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबण घेतायत, ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
राऊतांचे बंधू सुनील मतदान केंद्राबाहेर पोलिसांवरच भडकले, नेमक काय घडल?
राऊतांचे बंधू सुनील मतदान केंद्राबाहेर पोलिसांवरच भडकले, नेमक काय घडल?.
किरीट सोमय्या मतदानानंतर भावूक; म्हणाले, अनेक वर्षांनंतर आयुष्यात...
किरीट सोमय्या मतदानानंतर भावूक; म्हणाले, अनेक वर्षांनंतर आयुष्यात....
म्हणून मी पण रांगेत उभ राहिलो, महायुती उमेदवार कपिल पाटलांनी केल मतदान
म्हणून मी पण रांगेत उभ राहिलो, महायुती उमेदवार कपिल पाटलांनी केल मतदान.
आज 13 जागांसाठी मतदान, 6 जागा मुंबईच्या, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
आज 13 जागांसाठी मतदान, 6 जागा मुंबईच्या, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला.
2014 सालीच मविआचा प्लॅन! शरद पवारांचा नवा गौप्यस्फोट अन् उडाली खळबळ
2014 सालीच मविआचा प्लॅन! शरद पवारांचा नवा गौप्यस्फोट अन् उडाली खळबळ.