मला कळलं की माती खातोय…, आयुष्यातील मोठ्या गोष्टीचा प्राजक्ता माळीकडून मोठा खुलासा

मराठमोळी प्राजक्ता माळी हिने खासगी आयुष्याबद्दल केलाय मोठा खुलासा... प्राजक्ता हिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये प्राजक्ता हिने प्रेम आणि लग्न संस्थेबद्दल मोठा खुलासा केला आहे.

मला कळलं की माती खातोय..., आयुष्यातील मोठ्या गोष्टीचा प्राजक्ता माळीकडून मोठा खुलासा
फाईल फोटो
| Updated on: Oct 24, 2025 | 10:03 AM

मराठी सिनेविश्वातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेत्री कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. प्राजक्ता हिने अनेक मुलाखतींमध्ये स्वतःच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याबद्दल मोठं वक्तव्य देखील केलं आहे. आता देखील सोळल मीडियावर प्राजक्ता हिचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अभिनेत्रीने प्रेम आणि आजाच्या लग्न संस्थेबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या  सर्वत्र फक्त आणि फक्त प्राजक्ता माळी हिची चर्चा रंगत आहे.

प्राजक्ता माळी म्हणाली, मी प्रेमात पडते पण मला लग्न कमिटमेंट याची जरा भीती वाटते… मला माझी स्वतःची कंपनी आवडते… मला सिंगल राहायला आवडतं… अत्यंत स्वतंत्र आयुष्य मी जगत आली आहे. 2013 पासून मुंबईट एकटी राहते, त्यामुळे त्या स्वतंत्र आयुष्याची सवय झाली आहे, फ्रिडमची सवय लागली आहे…आणि एक कलाकार म्हणून देखील मी खूप फ्री सोल आहे. मला त्या एका बंधनात अडकायचं नाही…

लग्न संस्थेवर काय म्हणाली अभिनेत्री? 

आजच्या लग्न बंधनावर देखील अभिनेत्रीने मोठं वक्तव्य केलं आहे. आता ज्या लेव्हलला लग्नसंस्था विस्कळीत होत आहेत… त्यामुळे लग्न नको वाटतंय… अद्याप मी तेवढी प्रेमात पडलेली नाही…मी प्रेमात पडले, त्यानंतर मला कळलं की माती खातोय हा पोरगा, तेथेच मी त्याला बाय केलं… असं दोन – तीन वेळा झालं आहे.

शिवाय सध्या रडारवर कोणी आहे का? असा प्रश्न देखील प्राजक्ता हिला विचारण्यात आला. यावर अभिनेत्रीने नकार दिला. याआधी देखील प्राजक्ता माळी हिने लव्हलाईफबद्दल मोठा खुलासा केलेला, अभिनेत्री म्हणालेली, ‘पाच- सहा वर्षांपूर्वी मी एका व्यक्तीच्या प्रेमात होते. पण मग मला कळालं की तो माझ्याशी खोटं बोलतोय. ती गोष्ट मला पटली नाही. त्याला मी त्याचे पुरावेही दिले. पण खरं ॲक्सेप्ट करायला हिंमत लागते मात्र त्याने ते केलं नाही. म्हणून आम्ही बाजूला झालो, असं प्राजक्ताने सांगितलं.

प्रेमाबद्दल काय म्हणाली प्राजक्त माळी?

मध्ये-मध्ये मी प्रेमात पडते. पण मग मला कळतं की नाही, नाही, नाही… ही शेवटपर्यंत माझ्यासोबत नसणार आहे. मग मी जरा मागे येते. मी त्याला सांगते की सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. पण या गोष्टींचा प्रॉब्लेम आहे आणि मी बाजूला होते, असं प्राजक्ताने सांगितलं.

प्राजक्ता माळी हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये दमदार अभिनय करत अभिनेत्रीने चाहत्यांच्या मनोरंजन केलं. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर  प्राजक्ता हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.