सलमान खानसोबत ब्रेकअप, ऐश्वर्या राय का राहिली शांत? लव्हस्टोरीचं मोठं रहस्य उलगडलं
Salman Khan - Aishwarya Rai Breakup : सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्या नात्याचा वाईट अंत, ब्रेकअपनंतर का गप्प पाहिली ऐश्वर्या राय? लव्हस्टोरीचं 'ते' मोठं रहस्य उलगडलं, आजही दोघांचं नातं कोणत्यान कोणत्या कारणामुळे असतं चर्चेत...

Salman Khan – Aishwarya Rai Breakup : अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्या नात्याबद्दल आज सर्वांना माहिती आहे. एक काळ असा होता होता जेव्हा सलमान आणि ऐश्वर्या चाहत्यांना फॅशन गोल्स देत होते. दोघांच्या नात्याची सुरुवात तर चांगली झाली, पण दोघांच्या नात्यांचा अंत अत्यंत वाईट होता आणि त्याची चर्चा देखील तुफान रंगली. एवढंच नाही तर, ऐश्वर्याला सलमानच्या नावाची देखील चीड येत होती. त्याच्या सावलीपासून ऐश्वर्या दूर जाऊ लागली होती. पण एक प्रश्न देखील कायम मनात येतो आणि तो म्हणजे, ऐश्वर्या त्यांच्या नात्यबद्दल का काही बोलली नाही. नुकताच झालेल्या मुलाखतीत प्रल्हाद कक्कर यांनी ऐश्वर्या – सलमान यांच्या नात्याबद्दल मोठा खुलासा केला.
सलमान खान ब्रेकअप झाल्यानंतर का गप्प राहिली ऐश्वर्या राय?
सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्या नात्याचा अंत अत्यंत वाईट झाला. सलमान खान याच्यावर अनेक आरोप करण्यात आले. सलमान, ऐश्वर्या हिला कायम नियंत्रणात ठेवायचा, अभिनेता ऐश्वर्यासाठी प्रचंड पझेसिव्ह होता.. एवढंच नाही तर, सलमान याने ऐश्वर्याला मारहाण देखील केली… असं देखील सांगण्यात आलं होतं. दोघांच्या नात्याबद्दल अनेक चर्चा रंगल्या होत्या. पण सलमान आणि ऐश्वर्या यांनी त्यांच्या नात्याबद्दल कधीच खुलासा केला नाही.
चित्रपट निर्माते प्रल्हाद कक्कर यांनी दोघांच्या नात्याबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. प्रल्हाद म्हणाले, ऐश्वर्या अत्यंत पर्सनल व्यक्ती आहे… तिला असं वाटतं तिची पर्सनल लाईफ फक्त तिची पर्सनल लाईफ आहे.. तिच्या अत्यंत जवळच्या व्यक्तींसोबतच ती मनातील गोष्ट शेअर करते. पत्रकार परिषदेत बोलायला देखील ऐश्वर्याला आवडत नाही. सलमान खान याच्यासोबत ब्रेकअप झालं तेव्हा देखील ऐश्वर्या काहीही बोलली नाही…’ सांगायचं झालं तर, आजपर्यंत ऐश्वर्या हिने कधीच सलमान खान याच्यासोबत असलेल्या नात्याबद्दल वक्तव्य केलेलं नाही.
यावेळी प्रल्हाद कक्करने सलमानबद्दल जास्त काही सांगितलं नाही, पण त्याने निश्चितपणे सांगितलं की, सलमान एक ‘डिफिकल्ट’ अभिनेता आहे. सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, 1999 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हल दिल दे चुके समन’ सिनेमाच्या सेटवर दोघांची लव्हस्टोरी सुरु झाली. काही वर्ष दोघे एकत्र देखील राहिले. पण त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. 2002 मध्ये सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांचं ब्रेकअप झालं.
