वेश्या व्यवसाय करणारी महिला, तिच्याशी लग्न करण्यासाठी 2 ब्राह्मणांनी स्वीकारला इस्लाम
वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेशी लग्न करण्यासाठी 2 ब्राह्मणांनी स्वीकारला इस्लाम, तिची लेक बॉलिवूडची सुपरस्टार... प्रसिद्ध अभिनेत्याच्या कुटुंबाबद्दल फार कमी लोकांना आहे माहिती...

बॉलिवूडचा दमदार अभिनेता संजय दत्त याच्या कुटुंबाबद्दल कोणाला माहिती नाही? अभिनेत्याचे वडील सुनील दत्त आणि आई नरगिस दत्त यांनी एक काळ बॉलिवूड गाजवला होता. त्यांच्या अभिनयामुळे त्यांनी ओळख होती… अभिनेत्री नरगिस फक्त त्यांच्या अभिनयामुळेच नाही तर, सौंदर्यामुळे देखील चाहत्यांमध्ये चर्चेत असायच्या. नरगिस यांच्या सौंदर्याने बॉलिवूड आणि चाहत्यांच्या मनावर राज्य केलं होतं. पण नर्गिसची आईही लेकीपेक्षा कमी सुंदर नव्हती, पण तुम्हाला कदाचित माहित नसेल की त्यांच्या आई एक वेश्या होत्या.
कोलकाता येथे जन्मलेल्या नरगिस यांचं संगोपन एका वेश्यालयात झालं. त्यांची आई एक वेश्या होत्या ज्यांचं गायन ऐकनं मुलघांसाठी एक शान होती आणि त्या एका वेश्यालयाने भारताला पहिली महिला संगीतकार देखील दिली. त्याकाळात सिनेमांमध्ये काम करणं वेश्या व्यवसाय करण्यापेक्षा देखील वाईट मानलं जात होतं.
संजय दत्त याच्या आजीचं नाव जद्दनबाई
एक वेश्यालयातील गायिका भारतातील पहिली महिला संगीत दिग्दर्शक बनली आणि ती दुसरी तिसरी कोणी नसून नरगिसच्या आई जद्दनबाई होत्या. संजय दत्त हा जद्दनबाईचा नातू आहे. संजय दत्तची आजी इतकी सुंदर होती आणि तिचा आवाज मंत्रमुग्ध करणारा होता की दोन ब्राह्मणांनी तिच्याशी लग्न करण्यासाठी इस्लाम धर्म स्वीकारला.
नरगिस यांची आई जद्दनबाई फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध आणि लोकप्रिय कंपोजर होत्या. एवढंच नाहीतर, एक काळ असा देखील होता, जेव्हा त्यांची ओळख तवायफ म्हणून होती. नरगिस यांच्या वडिलांचं नाव मोहनचंद उत्तमचंद त्यागी असं होतं. जे एक ब्राह्मण उद्योजक होते. उत्तमचंद त्यागी ब्राह्मण धर्माचा त्याग करत इस्लाम स्वीकारला आणि जद्दनबाई यांच्यासोबत लग्न केलं. मोहनचंद उत्तमचंद त्यागी यांच्यासोबत जद्दनबाई यांचं तिसरं लग्न होतं.
वयाच्या 14 व्या वर्षी प्रसिद्धी झोतात आल्या नरगिस…
तकदीर’ सिनेमातून नरगिस प्रसिद्धी झोतात आल्या. तेव्हा त्या फक्त 14 वर्षांच्या होत्या. सिनेमात करीयर करत असताना नरगिस यांनी अभिनेते सुनील हत्त यांच्यासोबत लग्न केलं. 1981मध्ये नरगिस यांचंही कर्करोगाने निधन झालं आणि त्यांना त्यांच्या आई जद्दनबाई यांच्या कबरीजवळ पुरण्यात आलं.
