
मराठी इंडस्ट्रीतील असो किंवा मग बॉलिवूडमधील असो अनेक कलाकारांचे लहानपणीचे फोटो हे व्हायरल होत असतात. काही वेळेला त्यांचा फोटो पाहून ते कोण आहेत हे लक्षात येतं पण काहीवेळेला त्यांचे लहानपणीचे चेहरे आणि आताचा लूक हा लक्षात येत नाही. असाच एक फोटो आहे जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो एका अभिनेत्रीचा आहे जो पाहून कोणालाही लवकर अंदाज येणार नाही की ही अभिनेत्री कोण आहे ते?
सोशल मीडियावर सध्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या बालपणीच्या फोटोची चर्चा रंगली
तसेही अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियावर त्यांच्या आगामी सिनेमाचे अपडेट्स किंवा त्यांच्या वैयक्तिक जीवनातील अपडेट, एखादा किस्सा,फोटो शेअर करतच असतात. सोशल मीडियावर सध्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या बालपणीच्या फोटोची चर्चा रंगली आहे. या अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर तिच्या बालपणीचा फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये दिसणाऱ्या लहानग्या मुलीला पाहून पटकन अंदाज लावू शकणार नाही की.
चिमुकली आज अख्ख्या महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री
पण तुम्हाला माहितीये का फोटोत दिसणारी ही चिमुकली आज अख्ख्या महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री आहे. ती अनेकांची क्रश आहे. जिच्या स्टाईलने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावलं आहे. तिच्या अभिनयासोबतच तिच्या सौंदर्याचे देखील सर्वजण मोठे चाहते आहेत. ती फक्त एक अभिनेत्री नाही तर ती एक बिझनेस वुमन देखील आहे. ही मराठमोळी अभिनेत्री आहे सर्वांची लाडकी प्राजक्ता माळी. जिचे चित्रपटच नाही तर तिच्या मुलाखतींची पण तेवढीच चर्चा होते. हा फोटो प्राजक्ताचा लहानपणीचा फोटो आहे. जो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.
मराठी इंडस्ट्रीतील ही अभिनेत्री कायमच चर्चेचा विषय असते
प्राजक्ताने मालिकेमधून आपल्या करिअरची सुरुवात केली आणि काही वर्षांतच ती मराठी इंडस्ट्रीतील चर्चेचा विषय बनली. प्राजक्ता माळीनं इन्स्टाग्रामवर खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोत लहानपणीची प्राजक्ता सत्यनारायण पूजेसमोर हात जोडून बसलेली दिसते आहे. खास म्हणजे, तिने तोच क्षण पुन्हा रिक्रिएट केला आहे. प्राजक्तानं पुन्हा भावासोबत बसून अगदी तशीच पोझ देत फोटो काढला आहे. या फोटोंना तिनं “तेव्हा आणि आता… सत्यनारायण पूजेची आठवणी… उशीरा रक्षाबंधन”, असं कॅप्शन दिलंय. तिच्या या पोस्टवर चाहत्यांकडून आणि सेलिब्रिटी मित्रांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे.