AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धक्के, अपमान…डेंजर ब्रेकअप्स; स्वत:च सगळं ओढवून घेतलं म्हणत प्राजक्ता माळीने व्यक्त केल्या भावना

महाराष्ट्राची लाजकी अभिनेत्री असलेल्या प्राजक्ता माळीने तिची खास ओळख निर्माण करण्यासाठी फार मेहनत केली आहे. तिने एका मुलाखतीत तिच्या आयुष्याबद्दल बऱ्याच गोष्टी सांगितल्या. तिच्या अभिनयापासून ते तिच्या ब्रेकअप्सपर्यंत. तिने सर्व गोष्टींबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत.

धक्के, अपमान...डेंजर ब्रेकअप्स; स्वत:च सगळं ओढवून घेतलं म्हणत प्राजक्ता माळीने व्यक्त केल्या भावना
prajkta maliImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 05, 2025 | 1:23 PM
Share

सध्या मराठी इंडस्ट्रीमध्ये चर्चेत असणारी आणि जिच्याबद्दल सर्वांना जाणून घेण्याची इच्छा असणारी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. प्राजक्ता माळी महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री आहे. तिच्या फुलवंती या चित्रपटामुळे तर तिला खास ओळख मिळाली. तिची फॅनफॉलोईंग देखील बरीच वाढली. तसेच तिच्यातील अभिनयाचा एक वेगळाच पैलू प्रेक्षकांना पाहायला मिळाला. आज ती कितीही यशस्वी असली तरी तिने आयुष्यात खूप स्ट्रगल केला आहे. तिने अनेक मुलाखतींमध्ये तिच्या स्ट्रगलबदद्ल सांगितलं आहे. तिच्या लव्ह लाईफबद्दल सांगितलं आहे. तिने एका मुलाखतीत तिच्या आयुष्यातील बऱ्याच गोष्टी सांगितल्या.

वयाच्या 17 व्या वर्षांनंतर मी पुढे आयुष्यात एकदम डेंजरस काळ पाहिला

प्राजक्ता म्हणाली, ‘मी आयुष्यात विशेषत: टीएनएजनंतर खूप काही पाहिलं आहे. वयाच्या 17 व्या वर्षांनंतर मी पुढे आयुष्यात एकदम डेंजरस काळ पाहिला. त्यातूनच मी स्ट्राँग मुलगी म्हणून बाहेर पडले. मला जाणवलं की इतकं शांत राहिलात तर तुम्ही कुठेच पोहोचू शकणार नाही. छोटंच जग बनून राहील आणि एवढं तर मी राहू शकत नाही. मी इथे आयुष्य जगायला आलीये तर काहीतरी बँग ऑन करुनच जाणार. असं मी मरु शकत नाही.’ असं म्हणतं तिने तिच्या कठीण काळाबद्दल बरंच काही सांगितंल आहे.

‘डेंजर डेंजर ब्रेकअप्स झालेत’

प्राजक्ताने तिच्या लव्ह लाईफबद्दल सांगताना म्हटलं की, ‘डेंजर डेंजर ब्रेकअप्स झालेत. तसंच मी बरेच संघर्ष मी स्वत:च ओढवून घेतले. माझा पुणे-मुंबई स्ट्रगल खूप मोठा होता. कुटुंबाचा मानसिकरित्या पाठिंबा होता. पण प्रत्यक्षात आजूबाजूला मनुष्यबळ नाही. आजही माझे मुंबईत कोणीही नातेवाईक राहत नाहीत. मी खूप मानसिक, भावनिक संघर्ष पाहिला. त्या जोडीला आर्थिक संघर्ष होता. खूप टप्पे टोमणे, धक्के, पाणउतारा, अपमान, ग्रुपिजम, जातीवाद सगळंच पाहिलं. त्यातून मी घडत गेले. मेघना जशी हळूहळू रेशीमगाठीत फुलत गेली तर दुसरीकडे नकटी एकदम अशी बिंधास्त होती. त्या भूमिकांनीही मला तसं व्हायला मदत केली. या संघर्षांमुळेच मी बदलले.’ असं म्हणत प्राजक्ताने तिच्या बदलण्यामागचा स्ट्रगलही सांगितला.

प्राजक्ता माळीच्या वर्कफ्रंटबाबत…

प्राजक्ताने मुलाखीतत बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला. अगदी अभिनयातील तिचे सुरुवातीचे दिवस ते मालिका मिळाल्यानंतरचे तिचे दिवस सगळंच तिने सांगितलं. दरम्यान प्राजक्ता अध्यात्माकडे कशी वळाली याबद्दल देखील तिने भावना व्यक्त केल्या. प्राजक्ता माळीच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर, फुलवंतीनंतर चिकी चिकी बूबूम बूम या चित्रपटात ती दिसली होती. प्राजक्तासोबतच या सिनेमात स्वप्निल जोशी, प्रार्थना बेहेरे, प्रसाद खांडेकर, रोहित माने आणि प्रथमेश शिवलकर हेसुद्धा दिसून आले होते.

Follow Us
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद.
पुणे मेट्रोला नागरिकांचा चांगला प्रतिसाद; प्रवासी संख्या अडीच लाखांवर
पुणे मेट्रोला नागरिकांचा चांगला प्रतिसाद; प्रवासी संख्या अडीच लाखांवर.
पुण्यात आणखी एका वैष्णवीने जीवन संपवलं; सासरच्या जाचाला कंटाळून....
पुण्यात आणखी एका वैष्णवीने जीवन संपवलं; सासरच्या जाचाला कंटाळून.....
बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीवर अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया
बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीवर अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया.
पदवी घ्यावी की नको, कारण मानद पदवी मिळाल्यानंतर फडणवीस असं का म्हणाले?
पदवी घ्यावी की नको, कारण मानद पदवी मिळाल्यानंतर फडणवीस असं का म्हणाले?.
महापौरांच्या गाडीवर लाल दिव्यावरून राजकारण तापलं
महापौरांच्या गाडीवर लाल दिव्यावरून राजकारण तापलं.
बारामती, राहुरी पोटनिवडणुकीबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
बारामती, राहुरी पोटनिवडणुकीबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टर ऑफ सायन्स पदवी प्रदान
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टर ऑफ सायन्स पदवी प्रदान.
गॅससिलेंडरवरून राजकारण तापलं;अफवांमुळे रांगा लागल्याचा फडणवीसांचा दावा
गॅससिलेंडरवरून राजकारण तापलं;अफवांमुळे रांगा लागल्याचा फडणवीसांचा दावा.
इंधन टंचाईवरून राजकारण तापलं; संजय राऊतांचा मोदी-फडणवीसांवर निशाणा
इंधन टंचाईवरून राजकारण तापलं; संजय राऊतांचा मोदी-फडणवीसांवर निशाणा.