
Dharmendra Death : दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांच्या खासगी आयुष्याबद्दल कोणाला माहिती नाही असं कोणीच नाही. एक काळ असा होता जेव्हा धर्मेंद्र त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे सर्वत्र चर्चेत होते. बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर धर्मेंद्र यांचा अभिनेत्री हेमा मालिनी यांच्यावर जीव जडला. अशात हेमा मालिनी यांच्यासोबत लग्न करण्यासाठी धर्मेंद्र यांनी इस्लाम धर्म स्वीकारला… पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता त्यांनी हेमा मालिनी यांच्यासोबत दुसरा संसार थाटला… तेव्हा प्रकाश कौर यांना प्रचंड दुःख झालं असं…
प्रकाश कौर यांनी एका मुलाखती दरम्यान, मनातील खंत देखील बोलून दाखवली होती… ‘हेमा मालिनी यांच्या जागी मी असती, तर कधीच कोणाचं घर आणि संसार उद्ध्वस्त केला नसता…’ शिवाय नक्की कोणाला दोष देऊ.. असं म्हणत प्रकाश कौर म्हणालेल्या, ‘धर्मेंद्र माझ्या आयुष्यातील पहिले आणि शेवटचे पुरुष आहेत. ते माझ्या मुलांचे वडील आहेत. मी त्यांच्यावर प्रचंड प्रेम करते. मी त्यांचा सन्मान देखील करते. जे झालं ते झालं मला नाही माहिती कोणाला दोष दोऊ. त्यांना की नियतीला…’
पुढे प्रकाश कौर म्हणाला, ‘ते माझ्यापासून वेगळे होऊ शकतात. पण मला माहिती आहे मला जेव्हा त्यांची गरज भासेल तेव्हा ते कायम माझ्यासोबत असतील… मी कधीच त्यांच्यावर अविश्वास दाखवला नाही…’ असं देखील प्रकाश कौर म्हणाल्या होत्या…
धर्मेंद्र यांच्या पहिल्या लग्नाबद्दल सांगायचं झालं तर, 1954 मध्ये धर्मेंद्र यांचं पहिलं लग्न प्रकाश कौर यांच्यासोबत झालं होतं. धर्मेंद्र आणि प्रकाश कौर यांना दोन मुलं आणि दोन मुली आहेत. धर्मेंद्र यांच्या दोन मुली कधीच लाईमलाईटमध्ये आल्या नाहीत. धर्मेंद्र यांनी मुलींना सिनेमांमध्ये काम करण्याची कधीच परवानगी दिली नाही.
हेमा मालिनी आणि धर्मेंद्र
1980 मध्ये धर्मेंद्र यांनी अभिनेत्री हेमा मालिनी यांच्यासोबत लग्न केलं. पण जेव्हा धर्मेंद्र आणि हेमा यांनी लग्न केलं तेव्हा अभिनेते विवाहित होते. हेमा मालिनी यांना कायम धर्मेंद्र यांच्या दुसऱ्या पत्नीचा दर्जा मिळाला. शिवाय लग्नाच्या 45 वर्षांनंतर देखील हेमा मालिनी कधीच धर्मेंद्र यांच्या मुख्य घराची पायरी चढल्या नाहीत.