Prakash Raj: ‘चाणक्य आज लाडू खातील पण..’, प्रकाश राज यांच्याकडून उद्धव ठाकरेंचं कौतुक तर फडणवीसांवर टीका

प्रकाश राज हे हिंदी आणि दाक्षिणात्य सिनेमातील दिग्गज अभिनेते आहेत. 'सिंघम' या चित्रपटातील त्यांची जयकांत शिक्रे ही भूमिका चांगलीच गाजली. राजकीय मुद्द्यांवर सडेतोड भूमिका घेणारे कलाकार म्हणून ते प्रसिद्ध आहेत.

Prakash Raj: चाणक्य आज लाडू खातील पण.., प्रकाश राज यांच्याकडून उद्धव ठाकरेंचं कौतुक तर फडणवीसांवर टीका
Prakash Raj and Uddhav Thackeray
Image Credit source: Twitter
| Edited By: | Updated on: Jun 30, 2022 | 3:52 PM

अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj) अनेकदा भाजपविरोधी भूमिका स्पष्टपणे मांडताना दिसतात. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरेंचं कौतुक करणारं एक ट्विट केलं. या ट्विटमध्ये त्यांनी अप्रत्यक्षपणे देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर बहुमत गमावलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शक्तिपरीक्षेला सामोरं जाण्यापूर्वी राजीनामा दिला. त्यामुळे बुधवारी रात्री महाविकास आघाडी सरकार कोसळलं. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर प्रकाश राज यांनी हे ट्विट केलं. ‘चाणक्य आज लाडू खातील पण तुमचा सच्चेपणा अधिक काळ टिकेल. तुम्हाला अधिक शक्ती मिळेल,’ असं ते म्हणाले.

‘तुम्ही खूप छान केलात सर आणि मला खात्री आहे की तुम्ही ज्या पद्धतीने राज्य सांभाळलं त्यासाठी महाराष्ट्रातील लोक तुमच्या पाठीशी उभे राहतील. चाणक्य आज लाडू खातील पण तुमचा सच्चेपणा अधिक काळ टिकेल. तुम्हाला अधिक शक्ती मिळेल,’ अशा शब्दांत त्यांनी उद्धव ठाकरेंचं कौतुक केलं तर देवेंद्र फडणवीस यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली.

प्रकाश राज यांनी आणखी एका ट्विटवर प्रतिक्रिया देताना नरेंद्र मोदी आणि फडणवीसांवर टीका केली आहे. ‘देवेंद्र फडणवीस नवीन सभापतीची नियुक्ती करणार, उपसभापतींना यापुढे अपात्रतेच्या याचिकांवर निर्णय घेण्याचा अधिकार नाही, 11 जुलैला सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देणार,’ या ट्विटवर प्रकाश राज यांनी प्रतिक्रिया देताना लिहिलं, ‘ते काय ठरवतील? जेव्हा  सर्वोच्च नेते आणि त्यांचे चाणक्य यांनी सगळं आधीच ठरवलंच आहे.’

प्रकाश राज यांचं ट्विट 1-

प्रकाश राज यांचं ट्विट 2-

प्रकाश राज हे हिंदी आणि दाक्षिणात्य सिनेमातील दिग्गज अभिनेते आहेत. ‘सिंघम’ या चित्रपटातील त्यांची जयकांत शिक्रे ही भूमिका चांगलीच गाजली. राजकीय मुद्द्यांवर सडेतोड भूमिका घेणारे कलाकार म्हणून ते प्रसिद्ध आहेत. शिवाय, आपल्या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून तळागाळात जाऊन कामही ते करत असतात.