Prateek Kuhad: प्रतीक कुहाडच्या ब्रेकअपनंतर मीम्सचा महापूर; नेटकरी म्हणाले ‘क्या कसूर है मेरा’!

प्रतीक कुहाडच्या प्रेमभंगावर नेटकऱ्यांना सुचू लागले भन्नाट मीम्स; तुम्हीही पोट धरून हसाल

Prateek Kuhad: प्रतीक कुहाडच्या ब्रेकअपनंतर मीम्सचा महापूर; नेटकरी म्हणाले क्या कसूर है मेरा!
Prateek Kuhad: प्रतीक कुहाडच्या ब्रेकअपनंतर मीम्सचा महापूर
Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 28, 2022 | 3:03 PM

मुंबई: गायक प्रतीक कुहाड हा तरुणवर्गात प्रचंड लोकप्रिय आहे. प्रतीक कुहाडची गाणी ऐकली नाहीत आणि त्याच्या गायकीचा चाहता नाही असा क्वचितच एखादा तरुण असेल. प्रतीकने गायलेली बरीच गाणी हिट झाली आहेत. यामध्ये ‘खो गए हम कहां’, ‘कोल्ड/मेस’, ‘कसूर’ आणि ‘तुम जब पास’ या गाण्यांचा समावेश आहे. सोशल मीडियावर त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. प्रतीकने नुकतंच गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप झाल्याचं चाहत्यांना सांगितलं. यानंतर सोशल मीडियावर त्याच्याच गाण्यांवरून भन्नाट मीम्स व्हायरल होत आहेत.

प्रतीक गेल्या बऱ्याच वर्षांपासून डॉक्टर निहारिका ठाकूरला डेट करत होता. त्याने ब्रेकअप कारण नाही सांगितलं. मात्र आता दोघंही सोबत नसल्याचं प्रतीकने स्पष्ट केलं. एकीकडे काहींनी प्रतीकच्या ब्रेकअपवर दु:ख व्यक्त केलं. तर काही नेटकऱ्यांनी त्यावरून मीम्स तयार केले. हे मीम्स पाहून तुम्हीसुद्धा पोट धरून हसाल.

पहा मीम्स-

प्रतीक आणि निहारिका नेहमीच त्यांच्या रिलेशनशिपबद्दल सोशल मीडियावर मोकळेपणे व्यक्त झाले. या दोघांनी बऱ्याचदा एकमेकांसोबतचे रोमँटिक फोटो चाहत्यांसोबत शेअर केले होते.

प्रतीक हा स्वतंत्र आर्टिस्ट असून कोणत्याही म्युझिक लेबलशी त्याचा करार नाही. त्याने आतापर्यंत मुंबई, दिल्ली, चंदिगड, अहमदाबाद, सूरत आणि हैदराबादमध्ये परफॉर्म केलंय. मॅजिक मूमेंट्स म्युझिक स्टुडिओने गेल्या महिन्यात प्रतीकच्या वर्ल्ड टूरची घोषणा केली होती.