
Priya Marathe Death: प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री प्रिया मराठे हिचं निधन झालं आहे. अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत अभिनेत्रीने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. प्रिया मराठे हिने वयाच्या 38 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतल्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. तर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एवढंच नाही तर, सिनेविश्वावर शोककळा पसरली आहे. अनेकांनी सोशल मीडियावर प्रियाचे फोटो पोस्ट करत शोक व्यक्त केला. प्रिया मराठे हिच्या निधनानंतर सर्वत्र खळबळ माजली आहे.
प्रिया मराठे गेल्या अनेक वर्षांपासून झगमगत्या विश्वात सक्रिय होती. प्रिया हिच्या नेटवर्थबद्दल सांगायचं झालं तर, अभिनय, मॉडेलिंग, सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रिया हिने कोट्यवधी रुपयांची कमाई केली. मिळालेल्या माहितीनुसार, प्रिया मराठे हिच्याकडे 1 – 2 कोटी रुपयांची संपत्ती आहे. अभिनेत्रीचं मासिक उत्पन्न जवळपास प्रति प्रोजेक्ट 1 – 2 लाख रुपये असल्याचं सांगितलं जात आहे.
प्रिया मराठे हिच्या कार कलेक्शनबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीकडे टोयोटा फॉर्च्यूनर यांसारख्या आलिशान गाडी होती. जी तिची आवडती कार होती. सांगायचं झालं तर, प्रिया हिचं स्वतःचं कॅफे देखील होतं… पण निधनानंतर प्रिया सर्वकाही मागे सोडून गेली आहे.
प्रिया मराठे हिचा इन्स्टाग्राम पाहिल्यानंतर लक्षात येतं की, पती शंतनू यांच्यासोबत प्रिया हिने शेवटची पोस्ट 11 ऑगस्ट 2024 मध्ये शेअर केली होती. पोस्टमध्ये नवऱ्यासोबत प्रिया प्रचंड आनंदी दिसत आहे. प्रियाने पोस्टमध्ये जयपूरमधील आमेर किल्ल्याचं लोकेशन दिलं आहे. प्रियाने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, आमेर किल्ला, जयपूर, थ्रोबॅक, ट्रॅव्हल पार्टनर.
प्रिया मराठे आणि शंतनू यांनी 24 एप्रिल 2012 मध्ये लग्न केलं. दीड वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर प्रिया आणि शंतनू यांनी कुटुंबियांच्या सहमतीने लग्न केलं. दोघांच्या लग्नाचे फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. पण प्रिया हिच्या निधनानंतर शंतनू याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.