AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Priya Marathe Death: तिने कधीच कोणाला त्रास नाही दिला, पण…, प्रियाच्या निधनानंतर प्रसिद्ध अभिनेत्रीकडून दुःख व्यक्त

Priya Marathe Death: प्रिया मराठेच्या निधनानंतर सिनेविश्वावर शोककळा, प्रसिद्ध अभिनेत्री शोक व्यक्त करत म्हणाली, 'तिने कधीच कोणाला त्रास नाही दिला पण...', प्रियाच्या निधनानंतर चाहत्यांना बसलाय मोठा धक्का

Priya Marathe Death: तिने कधीच कोणाला त्रास नाही दिला, पण..., प्रियाच्या निधनानंतर प्रसिद्ध अभिनेत्रीकडून दुःख व्यक्त
फाईल फोटो
| Updated on: Aug 31, 2025 | 12:34 PM
Share

Priya Marathe Death: आयुष्यात कधी काय होईल काहीही सांगता येत नाही. आज सकाळी अभिनेत्री प्रिया मराठे हिच्या निधनाची माहिती समोर आली आणि मराठी सिनेविश्वावर मोठी शोककळा पसरली. प्रिया मराठे हिच्या निधनानंतर कुटुंबियांवर देखील दुःखाचा डोंगर कोसळला आहे. वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी प्रिया हिने अखेरचा श्वास घेतला आहे. कर्करोगामुळे अभिनेत्रीचं निधन झालं. प्रियाने मुंबई येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्रीच्या निधनानंतर चाहते आणि अनेक सेलिब्रिटी सोशळ मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त करत आहेत.

अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने देखील प्रिया मराठे हिच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे. प्राजक्ता म्हणाली, ‘आम्ही दोघींनी ‘एकापेक्षा एक’ अशा अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र काम केलं होतं. प्रिया एक अत्यंत गुणी, शांत, नम्र आणि सोज्वळ मुलगी होती. ती फक्त स्वतःच्या कामाशी काम ठेवायची…’

‘प्रियाने कधीच कोणाला त्रास दिला नाही. तिचं तिच्या कामावर नितांत प्रेम होतं… कोणी काहीही बोललं तरी तिने कधीच उलट उत्तर दिलं नाही… देव अशी चांगली माणसंच का नेते?…’ असा प्रश्न देखील प्राजक्ता माळी हिने यावेळी उपस्थित केला. सध्या प्रिया मराठे हिच्या निधनानंतर चाहते, मित्र परिवार यांच्यासह कुटुंबियांवर देखील दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रिया हिने रविवारी सकाळी 4 वाजता अखेरचा श्वास घेतला. गेल्या दोन वर्षांपासून अभिनेत्रीवर कर्करोगाचे उपचार सुरु होते. पण कर्करोगाशी अभिनेत्रीची झुंज फेल ठरली. अभिनेत्री प्रिया मराठे हिने झगमगत्या विश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. फक्त मराठी नाही तर, हिंदी मालिकांमध्ये देखील अभिनेत्रीने महत्त्वाच्या भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं.

प्रिया ‘तुझेच मी गीत गाते’ मालित मोनिका ही भूमिका साकारत होती. पण अभिनेत्रीने मध्येच मालिकेचा निरोप घेतला. मालिकेतून निरोप घेत असल्याचा व्हिडीओ देखील प्रियाने सोशल मीडियावर पोस्ट केला होता. प्रकृती स्थिर नसल्यामुळे तिने मालिकेतून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला होता. आता अभिनेत्रीच्या निधनाची माहिती समोर आल्यानंतर चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा