प्रिया मराठेचं नवऱ्याने स्टेजवर नाव घेतलं आणि…, त्यानंतर कुटुंबियांनी घेतलेला मोठा निर्णय
Priya Marathe Death: शंतनू आणि प्रियाची 'अधुरी प्रेम कहाणी...', एका पार्टीत सुरुझालेल्या सुंदर 'लव्हस्टोरी'चा कर्करोगाने केले घात, 'त्या' खास क्षणानंतर प्रिया आणि शंतनू यांच्या कुटुंबियांनी घेतलेला मोठा निर्णय

Priya Marathe Death: ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेमुळे चर्चेत आलेली अभिनेत्री प्रिया मराठे हिचं वयाच्या 38 व्या वर्षी निधन झालं आहे. कर्करोगामुळे अभिनेत्रीने अखेरचा श्वास घेतला. अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत प्रिया हिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. फक्त मराठी नाही तर हिंदी टीव्ही विश्वात देखील अभिनेत्री स्वतःची भक्कम ओळख निर्माण केली. पण प्रिया हिच्या निधनानंतर कुटुंबियांसह चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. आज प्रिया सर्वकाही मागे सोडून गेली आहे. ज्याला आयुष्यभर सोबत राहण्याचं वचन दिलं होतं, त्या शंतनू मोघे याला देखील अभिनेत्री एकटं सोडून गेली आहे.
शंतनू आणि प्रिया यांचं एकमेकांवर प्रचंड प्रेम होतं. एका पर्टीत झालेली ओळख लग्नापर्यंत पोहोतली. शंतनू आणि प्रिया यांनी 24 एप्रिल 2012 मध्ये लग्न केलं. दोघांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, प्रिया मुळची ठाण्याची होती. शुटिंगसाठी प्रिया अंधेरी येथे राहायची. प्रिया हिची रुममेट शर्वरी हिच्यामुळे शंतनू आणि प्रिया यांची ओळख झाली. ‘आई’ या मालिकेत शंतनू आणि प्रिया एकत्र काम करत होते. मालिका संपण्याच्या वेळेस झालेल्या पार्टीमध्ये शंतनू आणि प्रिया यांची मैत्री झाली.
पार्टीत झालेल्या मैत्रीचं अखेर प्रेमात रुपांतर झालं. अखेर फिल्मी स्टाईलमध्ये शंतनू याने प्रियाला प्रपोज केलं. चांदण्यांच्या प्रकाशात गुडघ्यावर बसून शंतनू याने प्रियाला प्रपोज केलं आणि प्रिया हिने देखील लगेच होकार दिला. पण दोघांना नातं गुपित ठेवण्याचा निर्णय घेतला. कुटुंबियांना देखील दोघांच्या नात्याबद्दल काहीही माहिती नव्हतं.
पण एका पुरस्कार सोहळ्या दरम्यान शंतनू याने स्टेजवरच प्रिया हिचं नाव घेतलं आणि कुटुंबियांना दोघांच्या नात्याबद्दल कळलं… अखरे दोन्ही कुटुंबियांकडून होकार असल्यामुळे प्रिया आणि शंतनू यांचं लग्न मोठ्या थाटात पार पडलं. शंतनू आणि प्रिया इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक होतं. दोघांचे असंख्य असे खास क्षण आहेत. पण प्रिया हिच्या निधनानंतर शंतनू याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे..
प्रिया हिच्या कठीण काळात शंतनू याने पत्नीची पूर्ण काळजी घेतली. त्याने कधीच प्रियाला एकटं सोडलं नाही… पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. गेल्या दोन वर्षांपासून प्रिया कर्करोगावर उपचार घेत होती. पण या लढाईत प्रिया हिला अपयश आलं आणि तिने प्राण गमावले.
गेल्या एक वर्षापासून प्रिया सोशल मीडियावर देखील सक्रिय नव्हती. प्रिया ‘तुझेच मी गीत गाते’ मालित मोनिका ही भूमिका साकारत होती. पण अभिनेत्रीने मध्येच मालिकेचा निरोप घेतला. मालिकेतून निरोप घेत असल्याचा व्हिडीओ देखील प्रियाने सोशल मीडियावर पोस्ट केला होता. प्रकृती स्थिर नसल्यामुळे प्रिया हिने मालिकेतून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला होता. प्रिया हिच्या निधनानंतर सिनेविश्वात शोककळा पसरली आहे.
