पोरीने आता संसार उभा केला बिचारी…, प्रिया मराठेला श्रध्दांजली वाहताना ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी भावनाविवश
Priya Marathe Death: त्या पोरीने आता संसार उभा केला होता आणि असं झालं... बिचारी..., अभिनेत्री प्रिया मराठे हिने वयाच्या 38 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास..., श्रध्दांजली वाहताना ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी भावनाविवश

Priya Marathe Death: त्या पोरीने आता संसार उभा केला होता आणि असं झालं… बिचारी…, देव तिच्या आत्म्याला शांती देवो… हे तिचं जायचं वय नव्हतं…. अभिनेत्री प्रिया मराठे हिच्या निधनानंतर ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी भावनाविवश झाल्या. प्रियाच्या निधनावर शोक व्यक्त करताना उषा नाडकर्णी याच्या डोळ्यात पाणी आलं. सांगायचं झालं तर, उषा नाडकर्णी आणि प्रिया मराठे यांनी एकत्र ‘पवित्र रिश्ता’ मालिकेत काम केलं होतं. ज्यामुळे प्रियाच्या निधनानंतर अभिनेत्री अधिक भावूक झाल्या…
उषा नाडकर्णी म्हणाल्या, मला खरंच खूप वाईट वाटलं, मध्ये मी अंकिताला भेटले होते तेव्हा मी ठरवलं होतं, सगळ्यांनी मिळून तिला भेटायला जायचं. पण अंकिता मला म्हणाली, शंतनू म्हणाला तिला भेटायला येऊ नका. तिचे केस जात असतील म्हणून… तरीसुद्धा मी म्हणाले जाऊन भेटून येऊ, पण वाटलं नव्हतं इतक्या लवकर ती जाईल म्हणून मला खूप वाईट वाटलं… असं नको व्हायला, देव असं का करतो कळत नाही मला… त्या पोरीने आता संसार उभा केला होता आणि असं झालं… बिचारी…, देव तिच्या आत्म्याला शांती देवो… हे तिचं जायचं वय नव्हतं…. असं म्हणत उषा नाडकर्णी यांनी भावना व्यक्त केल्या.
प्रिया मराठे हिच्या निधनाने सिनेविश्वात शोककळा…
मिळालेल्या माहितीनुसार, प्रिया हिने रविवारी सकाळी 4 वाजता अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्री प्रिया मराठे हिने झगमगत्या विश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. फक्त मराठी नाही तर, हिंदी मालिकांमध्ये देखील अभिनेत्रीने महत्त्वाच्या भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण गेल्या दोन वर्षांपासून अभिनेत्रीवर कर्करोगाचे उपचार सुरु होते. पण कर्करोगाशी अभिनेत्रीची झुंज फेल ठरली.
अभिनेत्री 1 वर्षापासून सोशल मीडियावर देखील सक्रिय नव्हती. एका मालिकेत देखील अभिनेत्री सक्रिय होती. प्रिया ‘तुझेच मी गीत गाते’ मालित मोनिका ही भूमिका साकारत होती. पण अभिनेत्रीने मध्येच मालिकेचा निरोप घेतला. मालिकेतून निरोप घेत असल्याचा व्हिडीओ देखील प्रियाने सोशल मीडियावर पोस्ट केला होता. प्रकृती स्थिर नसल्यामुळे तिने मालिकेतून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला होता. तिचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे…
