AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रिया प्रकाश वारियर हिने दिली प्रेमाची कबुली; कोणाच्या प्रेमात आहे ‘विंग गर्ल’?

Priya Prakash Varrier : नजरेनं चाहत्यांच्या घायाळ करणाऱ्या 'विंग गर्ल'च्या मनावर कोणाचं राज्य? सर्वांसमोर प्रिया प्रकाश वारियर हिने दिली प्रेमाची कबुली, पाहा फोटो... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त प्रिया प्रकाश वारियर हिच्या सोशल मीडिया पोस्टची चर्चा...

प्रिया प्रकाश वारियर हिने दिली प्रेमाची कबुली; कोणाच्या प्रेमात आहे 'विंग गर्ल'?
| Updated on: Jan 09, 2024 | 12:46 PM
Share

मुंबई | 9 जानेवारी 2024 : नशीब आपल्यावर कधी मेहरबान होईल, हे सांगता येत नाही असं म्हणतात… झगमगत्या विश्वात आणि सोशल मीडियावर असे अनेक सेलिरब्रिटी आहेत, ज्यांचं नशीब एका रात्रीत चमकलं… असंच काही झालं आहे, प्रिया प्रकाश वारियर हिच्यासोबत. अवघ्या 26 सेकंदांच्या एका व्हिडीओने प्रिया हिचं नशीब रातोरात पालटलं. एका व्हिडीओमुळे प्रियासोशल मीडिया सेन्सेशन ठरली होती. तेव्हापासूनच प्रिया ‘नॅशनल क्रश’ म्हणून ओळखली जाते… सोशल मीडियावर देखील प्रिया हिने अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. आता तर प्रिया हिने तिच्या प्रेमाची कबुली दिली आहे..

प्रिया हिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. फोटोंमध्ये प्रिया लंडन याठिकाणी फिरताना दिसत आहे. प्रिया हिच्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. फोटो पोस्ट करत प्रिया हिने कॅप्शनमध्ये प्रेमाची कबुली दिली आहे. सांगयाचं झालं तर, प्रिया कोणत्या व्यक्तीच्या प्रेमात नाही तर, लंडन या देशाच्या प्रेमात आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त प्रिया हिच्या सोशल मीडिया पोस्टची चर्चा रंगली आहे.

प्रिया हिच्या सोशल मीडिया पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. प्रिया हिच्या फोटोंवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, ‘तू जाणून घे… तू माझ्यासाठी सर्वात सुंदर आहे…’ तर काही नेटकऱ्यांनी इमोजी कमेंटमध्ये पोस्ट करत प्रिया हिच्यावर प्रेम व्यक्त केलं आहे. काही तासातच प्रिया हिच्या पोस्टवर 31 हजारपेक्षा अधिक चाहत्यांनी लाईक केलं आहे.

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त प्रिया प्रकाश वारियर हिची चर्चा रंगली आहे. ‘विंक गर्ल’ कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. 2018 मध्ये ‘ओरु अदार लव्ह’ या सिनेमातील एक सीन सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाला होता. त्यामध्ये शाळेच्या गणवेशात दिसणारी प्रिया एका मुलाला डोळा मारताना दिसली होती. तिची ही स्टाइल इतकी लोकप्रिय झाली की लोक तिला ‘विंक गर्ल’ असंच म्हणू लागले.

प्रिया हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. प्रिया कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सोशल मीडियावर कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत प्रिया चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक फोटो आणि व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करतात.

निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.