
मायानगरी मुंबईत अनेक कलाकार स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी येत असतात. पण या मायानगरी राहून स्वप्न पूर्ण करणं फार सोपं नाही. मुंबई शहर नव्या लोकांची परीक्षा घेत असते. अभिनेता प्रियदर्शन जाधव याने देखील करीयरच्या सुरुवातीला आलेल्या चढ – उतारा बद्दल नुकताच झालेल्या एक मुलाखतीत मोठं वक्तव्य केलं. अभिनेत्याने सार्वजनिक शौचालय वापरला आहे. तर त्याच्या घरात तृतीयपंथी देखील राहायचे.. सध्या सर्वत्र प्रियदर्शन याच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे .
नुकताच झालेल्या एका मुलाखतीत प्रियदर्शन जाधव म्हणाला, ‘मुंबई शहराची फार मोठी गंमत आहे. हे शहर फार लवकर कोणाला जवळ करतनाही. बाहेरुन आलेल्या माणसाची पराकोटीची परीक्षा हे शहर पाहत असतं. ती परीक्षा फार भयंकर असते… मुंबईत मी 22 भाड्याच्या घरात राहिलो… मी बराच काळ सार्वजनिक शौचालय वापरलेलं आहे…’
माझ्या बाजूला तृतीयपंथी राहायचे… बरोबर माझ्या बाजूला… मी याआधी देखील एकदा सांगितलं आहे. 8 – 10 जण राहायचे, त्यांच्या लक्षात आलं की मी सकाळी सातला जातो आणि रात्री 2 वाजता येतो… एके दिवशी त्यांच्या माझा दरवाजा ठोठावला आणि मला विचारलं तू काय काम करतोस? मी सांगितलं नाटक आणि सिनेमांमध्ये काम करतो… तू सकाळी सात वाजता जातोस रात्री दोन वाजता येतोस… त्यांनी मला विचारलं, तुझ्या रुमची किल्ली मिळेल का? आम्ही आठ जण आहोत आणि आम्हाला फार अडचणीत राहावं लागतं… रात्री एक दीडला आम्ही निघू… तोपर्यंत चार जण तिकडे राहतील 4 जण इकडे राहतील…
पुढे अभिनेता म्हणाला, ‘मी सुद्धा त्यांना ओके म्हणालो… मला भीती वाटली नाही असं नाही… मला भीती वाटली… पण आपण त्यांना जे समजतो ना तसे ते अजिबात नाही… अतिशय सामान्य आयुष्य जगणारी माणसंच आहेत. त्यानंतर ते माझ्यासाठी डब्बा ठेवू लागले. ते जे जेवायचे तेच मला ठेलायचे भुर्जी, चिकन… मी जिथे राहायचो तिथेली 25 पैसे देखील चोरीला गेले नाहीत. कोणती वस्तू कधी इकडची तिकडे झाली नाही.
‘तेव्हा माझ्याकडे 9602149029 नावाचा पेजर होता. ते सतत मला एसटीडी, पीसीओ बूथवरुन मेसेज करायचे.. अंडा भुर्जी…. मला कळायचं आज अंडा भुर्जी आहे… त्यातले काही मला अजूनही भेटतात… अशी ही मुंबई आहे…’ अशा जुन्या आठवणी अभिनेत्याने चाहत्यांसोबत शेअर केल्या…