AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एका kissचा किस्सा… निक जोनाससमोरच प्रियांकाने दुसऱ्या अभिनेत्याला केले किस

Priyanka Chopra Kiss : न्यूयॉर्कमध्ये प्रियांकाच्या 'लव्ह अगेन' चित्रपटाचा प्रीमियर झाला, ज्यामध्ये प्रियंका पती निक जोनाससोबत पोहोचली. मात्र त्यावेळी तिच्या एका कृतीने सर्वांचेच लक्ष वेधले.

एका kissचा किस्सा... निक जोनाससमोरच प्रियांकाने दुसऱ्या अभिनेत्याला केले किस
Image Credit source: instagram
| Updated on: May 04, 2023 | 11:16 AM
Share

Priyanka Chopra Hollywood Movie Love Again : अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या खूप बिझी आहे. नुकतीच तिची ‘सिटाडेल’ ही मालिका प्रदर्शित झाली आहे. आता तिचा लव्ह अगेन हा चित्रपट (Love Again) लवकरच प्रदर्शित होणार आहे. हॉलिवूड चित्रपट लव्ह अगेनचा प्रीमियर न्यूयॉर्कमध्ये झाला. जिथे प्रियांका चोप्रा पती निक जोनाससोबत पोहोचली होती. रेड कार्पेटवर प्रियांकाने तिचा सहकलाकार सॅम ह्यूघनला (sam heughan) नाकावर किस केले. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या खूप व्हायरल होत आहे.

लव्ह अगेनच्या प्रीमियरच्या वेळी प्रियांका निकच्या हातापर्यंत पोहोचली. प्रियांकाने ब्लश ब्लू गाऊनसह हाय हील्स घातल्या होत्या, ज्यामध्ये ती निकपेक्षा खूपच उंच दिसत होती. सरळ केस आणि ऑफ शोल्डर गाऊन तिच्या सौंदर्यात भर घालत आहे. त्याचवेळी निक जोनासने ग्रे रंगाचा सूट परिधान केला होता. दोघेही एकत्र खूप स्मार्ट दिसत होते.

View this post on Instagram

A post shared by Jerry x Mimi ? (@jerryxmimi)

प्रियांकाला रेड कार्पेटवर पाहताच हॉलिवूड स्टार सॅम ह्यूघनने समोर येऊन तिला किस केले. चुंबन घेताना प्रियांकाने पाऊट केले पण सॅमने तिच्या मानेवर चुंबन दिले. या दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडते. एका फोटोमध्ये सॅम प्रियांकाच्या नाकाचे चुंबन घेताना दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Priyanka (@priyankachopra)

लव्ह अगेन या प्रियांका चोप्राच्या या चित्रपटात तिचा पती निक जोनास देखील दिसणार आहे. या चित्रपटात निकची छोटी भूमिका आहे. याबद्दल बोलताना प्रियांका म्हणाली की, मी निकला विचारले की तू ही भूमिका करू शकतोस का? निकने यासाठी होकार दिला.

View this post on Instagram

A post shared by Priyanka (@priyankachopra)

‘लव्ह अगेन’मध्ये प्रियांका चोप्रा जोनास एका महिलेची भूमिका साकारत आहे जिला तिच्या पतीच्या मृत्यूनंतर तिचा नंबर कोणीतरी म्हणजे सॅम ह्यूघन वापरत आहे हे कळत नाही. हा एक रोमँटिक ड्रामा चित्रपट आहे. सिटाडेलच्या प्रमोशननंतर आता प्रियांका तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अलीकडेच प्रियांकाने पती निकसोबत मेट गाला 2023 च्या रेड कार्पेटवर दिसली होती.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?