मला तुझी पँटी दिसायला हवी…;प्रियांका चोप्राने सांगितली बॉलिवूडची काळी बाजू

प्रियांका चोप्राने आपल्या बॉलिवूड प्रवासातल्या एक धक्कादायक अनुभव शेअर केला. एका दिग्दर्शकाने तिला अश्लील प्रस्ताव दिला होता. यामुळे प्रियांका पुरती घाबरली होती. प्रियांकाने तिला आलेला हा कास्टिंग काऊचा अनुभव पहिल्यांदाच सर्वांसमोर सांगितला.

मला तुझी पँटी दिसायला हवी...;प्रियांका चोप्राने सांगितली बॉलिवूडची काळी बाजू
| Updated on: Feb 04, 2025 | 1:21 PM

बॉलिवूडची दुनिया ही जेवढी ग्लॅमरस आहे तेवढीच ती चढ-उतारांनी भरलेली आहे. बॉलिवूडमध्ये सुरुवातीला अनेक अभिनेत्री आणि अभिनेत्यांचा अनुभव फारसा काही चांगला नव्हता. अनेकांना अतिशय धक्कादायक अनुभवही आले आहेत. ज्याला कास्टिंग काऊचही म्हणता येईल. आता जे बॉलिवूडमध्ये सुपरस्टार आहेत त्यांनाही बऱ्याचदा काही विचित्र प्रसंगांमधून जाव लागलं होतं आणि त्यांनी ते अनेक मुलाखंतीमध्ये सांगितलं आहे.

प्रियांका चोप्राला आलेला धक्कादायक अनुभव

बॉलिवूडची सुपरस्टार असलेल्या एका अभिनेत्रीलाही असाच विचित्र अनुभव आला होता. जेव्हा तिने नवीनच या इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं होतं.ही अभिनेत्री आहे प्रियांका चोप्रा. प्रियांका आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. अनेक गोष्टींवर तिने आजपर्यंत तिची मतं मांडली आहेत. प्रियांका फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर हॉलिवूडमध्येही तेवढीच प्रसिद्ध आहे.

प्रियांका नेहमी तिच्या अॅक्टींग जर्नीबद्दल मोकळेपणाने बोललेली आहे. एवढच नाही तर प्रियांकाने तिला आलेला कास्टिंग काऊचाही अनुभव सांगितला आहे. नुकतंच तिने एका कार्यक्रमात बॉलिवूड दिग्दर्शकासोबत आलेला धक्कादायक अनुभव शेअर केला आहे. त्यावेळी प्रियांका चोप्रा 19 वर्षांची होती. या घटनेने ती इतकी दुखावली आणि घाबरली होती की, तिने तो चित्रपट सोडला होता.

प्रियांकाचा कास्टिंग काऊचा अनुभव

प्रियांका चोप्राने तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यात घडलेली ही घटना सांगितली. वयाच्या 19 व्या वर्षी एका चित्रपटात काम करत असताना तिने दिग्दर्शकाशी बोलत असताना. यावेळी तिने या भूमिकेसाठी नेमके कसे कॉस्ट्यूम लागणार आहेत, तसंच स्क्रीनवर कसं दिसणं अपेक्षित आहे यासंदर्भात आपल्या स्टायलिस्टसह बोलण्याची विनंती केली होती.

 शॉर्ट पँटी घालण्यासाठी जबरदस्ती

तिने सांगितलं की, “त्यांनी फोन उचलला आणि म्हणाले की, ती प्रियांका जेव्हा पँटी दाखवेल तेव्हा लोक येऊन तिच्यासाठी चित्रपट पाहणार आहेत. त्यामुळे ती घालत असणारी पँटी फार छोटी असायला हवी. मलाही ती पँटी दिसायला हवी. तुला माहितीये ना जे लोक पुढे बसलेले असतील? त्यांना ती पँटी दिसायला हवी. त्यांनी चार वेळा ही एक गोष्ट सांगितली”.हे ऐकून प्रियांकाला काहीच समजत नव्हतं.

आईने प्रियांकाला दिलेला सल्ला 

प्रियांका चोप्राने घरी आल्यानंतर आई मधू चोप्रा यांना घडलेला सगळा प्रकार सांगितला. आपण त्या दिग्दर्शकाच्या चेहऱ्याकडेही पाहू शकत नव्हतो असं तिने आईला म्हटलं. तिने आईला सांगितलं की “जर ते माझ्या असा विचार करत असतील, त्यांच्या मते मी इतकी छोटी असेल तर मग प्रगती करण्यासाठी काहीही करायचं नाही”. या प्रकारानंतर प्रियांका चोप्राने चित्रपट सोडण्याचा निर्णय घेतला आणि नंतर  कधीच त्या दिग्दर्शकासह काम केलं नाही.

प्रियांकाच्या कामाबद्दल…

दरम्यान प्रियांकाच्या कामाबद्दल बोलायचं गेल्यास प्रियांकाने नुकतंच ‘सिटाडेल सीझन 2’चं शूटिंग पूर्ण केलं आहे, याशिवाय The Bluff आणि Heads of State यांचं शूटिंग सुरु आहे. याशिवाय एस एस राजामौली यांच्या एका चित्रपटात ती महेश बाबू आणि जॉन अब्राहम यांच्यासोबत झळकण्याची शक्यता आहे.  प्रियांकाने फक्त बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्येच नाही तर मराठी चित्रपटांच्या माध्यमातूनही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.