AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रियांका चोप्राच्या वहिनीला लग्नानंतर होतोय याचा त्रास,दाखवल्या मानेवरील खुना; म्हणाली ‘हे काय चाललंय?’

प्रियांका चोप्राची वहिनी नीलम उपाध्यायला लग्नाच्या 3 ते 4 दिवसांनीच या गोष्टीचा त्रास होऊ लागला आहे. तिने तिच्या मानेवरील खुणांचा फोटोच थेट सोशल मीडियावर शेअर केला आहे. तसेच 'कृपया मला यावर सोल्यूशन द्या'असंही तिने म्हटलं आहे.

प्रियांका चोप्राच्या वहिनीला लग्नानंतर होतोय याचा त्रास,दाखवल्या मानेवरील खुना; म्हणाली 'हे काय चाललंय?'
Mayuri Sajerao
Mayuri Sajerao | Updated on: Feb 13, 2025 | 8:40 PM
Share

अभिनेत्री प्रियांका चोप्राचा भाऊ सिद्धार्थ चोप्राचं लग्न नुकतच पार पडलं. नीलम उपाध्याय ही आता प्रियांका चोप्राच्या कुटुंबात तिची वहिनी म्हणून आली आहे. या लग्नात सर्वांनीच फार एन्जॉय केलेलं पाहायला मिळालं. पण लग्नाच्या अवघ्या तीन ते चार दिवसांनीच नीलम उपाध्याय सोबत असं काही घडलं की तिने थेट ती पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

मानेवर झालेल्या लालसर खुणांचा फोटो सोशल मीडियावर 

नीलमने तिच्या मानेवर झालेल्या लालसर खुणांचा फोटोच सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या फोटोत तिच्या मानेवर सर्व लाल चट्टे पडलेले दिसत आहेत.नीलमने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर ही पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने लिहिले आहे की, ‘काय चाललंय?’ मला खूप त्रास होतोय.

मला वाटतं की अंगाला लावलेल्या हळदीचा सूर्यप्रकाशाशी संपर्क आल्यावर ही रिएक्शन झाली आहे. पण मी हळदी समारंभाच्या काही दिवस आधीच पॅच टेस्ट केली होती आणि तेव्हा सर्व काही ठीक होते. यावर काही उपाय आहे का?” असं म्हणतं तिने तिला झालेल्या या एलर्जीबद्दल सांगितलं आहे आणि यावर काही उपाय आहे का असं विचारलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Priyanka (@priyankachopra)

लग्नाच्या प्रत्येक सेलिब्रेशनचे फोटो इंस्टाग्रामवर

सिद्धार्थ चोप्रा आणि नीलम यांचे नुकतेच मुंबईत भव्य लग्न झाले. लग्नाच्या प्रत्येक सेलिब्रेशनचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये हळदी समारंभाचे फोटो देखील आहेत. खरंतर, लग्नापूर्वीच्या विधींमध्ये हळदीचा विधी एक अतिशय प्रसिद्ध विधी आहे, जो मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. पण हळद ही अशीच एक गोष्ट आहे, जी प्रत्येक त्वचेला इतक्या सहजपणे सूट होत नाही. काहींना तिची एलर्जी असते त्यामुळे त्वचा लालसर पडते तसेच त्वचेची जळजळही होते आणि असंच काहीसं नीलमच्या बाबतीतही झालं आहे.

प्रियांकाप्रमाणेच नीलम अभिनय क्षेत्रात 

नीलम उपाध्याय देखील तिच्या प्रियांकाप्रमाणेच चित्रपट जगताशी संबंधित आहे. नीलम अनेक तमिळ आणि तेलगू चित्रपटांमध्ये दिसली आहे. ‘एमटीव्ही स्टाईल चेक’ केल्यावर ती प्रसिद्धी झोतात आली. 2012 मध्ये, नीलमने ‘मिस्टर 7’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. तिने अ‍ॅक्शन 3डी, उन्नोडू ओरू नाल आणि ओम शांती ओम मध्येही काम केलं आहे. नीलम आणि सिद्धार्थची भेट एका डेटिंग अॅपद्वारे झाली. होती.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...