Jui Gadkari | रुग्णामागे मिळणारे दीड लाख बंद झाल्याने कोरोनाची दुसरी लाट?” अभिनेत्री जुई गडकरीचा संताप

| Updated on: Mar 20, 2021 | 1:32 PM

कर्जतजवळच्या अंकल्स किचनबाहेर दोनशेपेक्षा जास्त गाड्या लागल्या होत्या आणि जोरदार लग्न सुरु होता. मग 50 माणसांचा नियम कुठे गेला?" असे प्रश्न जुईने प्रशासनाला विचारले आहेत. (Jui Gadkari Facebook Post COVID Tests)

Jui Gadkari | रुग्णामागे मिळणारे दीड लाख बंद झाल्याने कोरोनाची दुसरी लाट? अभिनेत्री जुई गडकरीचा संताप
अभिनेत्री जुई गडकरी
Follow us on

मुंबई : मॉलमध्ये प्रवेशासाठी कोव्हिडचा निगेटिव्ह रिपोर्ट बंधनकारक केल्यावरुन अभिनेत्री जुई गडकरीने (Marathi Actress Jui Gadkari) संताप व्यक्त केला आहे. ठाण्याचे जांभळी मार्केट आणि बेस्टच्या तुडुंब भरलेल्या बसमधून जायला कोणता रिपोर्ट द्यायचा? असा सवाल जुईने उपस्थित केला आहे. फेसबुकवर आपल्या रागाला वाट मोकळी करुन देताना तिने गर्दीचे काही फोटो शेअर केले आहेत. प्रत्येक रुग्णामागे मिळणारे दीड लाख बंद झाले म्हणून ही दुसरी लाट आली आहे?” असा गंभीर आरोप जुईने केला आहे. (Pudhcha Paool Bigg Boss Marathi fame Marathi Actress Jui Gadkari Facebook Post on COVID Tests)

काय आहे जुई गडकरीची फेसबुक पोस्ट?

“कोव्हिड19 निगेटिव्ह रिपोर्ट मॉलमध्ये प्रवेशासाठी बंधनकारक. आणि ठाण्याच्या जांभळीच्या मार्केटमध्ये जायला कोणता रिपोर्ट? बेस्टच्या तुडुंब भरुन जाणाऱ्या बसमधून जायला कोणता रिपोर्ट? परवाच कर्जतजवळच्या अंकल्स किचनबाहेर दोनशेपेक्षा जास्त गाड्या लागल्या होत्या आणि जोरदार लग्न सुरु होता. मग 50 माणसांचा नियम कुठे गेला?” असे प्रश्न जुईने प्रशासनाला विचारले आहेत.

“मॉलमध्ये चिकटून तरी बसत नाहीत”

“आजही काही मोठ्या युनिव्हर्सिटीज (पारुल युनिव्हर्सिटी) कॉन्व्होकेशन करत आहेत, 4500 जणांसह, रुल्स करताय तर सगळीगडे सारखे करा. मॉलमध्ये लोक निदान एकमेकांना चिकटून तरी बसत नाहीत. तरी टेस्ट कम्पलसरी आणि बेस्ट बसेसमध्ये जवळजवळ एकमेकांच्या मांडीत बसतात” असंही जुईने लिहिलंय.

“कोरोनाग्रस्त मैत्रिणीला स्तनपानाची मुभा”

“परवा माझ्या एका मैत्रिणीचा डिलीव्हरी आधी कोव्हिड रिपोर्ट केला आणि तो दुर्दैवाने पॉझिटिव्ह आला. तिचा सी सेक्शन करावं लागलं वेगळ्याच हॉस्पिटलला. कारण तिला ज्या हॉस्पिटलमध्ये डिलीव्हरीसाठि नेलं होतं, त्यांनी तिला दाखल करण्यास नकार दिला. विनोदाची गोष्ट म्हणजे कोरोनाग्रस्त रुग्ण असूनही तिला बाळाला स्तनपान करु दिलं. बाळ तिच्यापासून अवघ्या पाच फुटांवर ठेवलं होतं. ती असिम्पटमॅटिक होती. त्यांना भरमसाठ बिल भरावं लागलं.” अशी तक्रार जुईने फेसबुक पोस्टमधून मांडली.

“नक्की काय चाललंय काहीच कळायला मार्ग नाही. कोरोना खरंच आहे की आता प्रत्येक रुग्णामागे दीड लाख मिळत होते, ते बंद झाले म्हणून ही दुसरी लाट आली आहे?” असा गंभीर सवालही जुईने उपस्थित केला आहे.

वाचा जुई गडकरीची फेसबुक पोस्ट

Covid-19 -ve report compulsory for entering malls! Ani Thanyacha Jambhli cha market madhe jayla konta report?? Best cha…

Posted by Jui Gadkari on Friday, 19 March 2021