AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रसिद्ध गायकाचा कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह, 4 – 5 दिवसांपूर्वीच झालेला मृत्यू, बेडभोवती रक्ताचे डाग अन्…

प्रसिद्ध पंजाबी गायकाचा कुजलेल्या अवस्थेत घरातच मृतदेह आढळल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे, समोर येत असलेल्या माहितीनुसार, गायकाचा मृत्यू चार ते पाच दिवसांपूर्वीच झालेला. गायकाच्या घरातून दुर्गंधी आल्यानंतर शेजाऱ्यांनी अधिकाऱ्यांना याची माहिती पोलिसांना दिली.

प्रसिद्ध गायकाचा कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह, 4 - 5 दिवसांपूर्वीच झालेला मृत्यू, बेडभोवती रक्ताचे डाग अन्...
| Updated on: Sep 05, 2026 | 9:36 AM
Share

झगमगत्या विश्वातून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. लुधियाना जिल्ह्यातील सुधार पट्टी धालीवाल गावातील राहत्या घरी पंजाबी गायक आणि लेखक बलजीत सिंग यांचा मृतदेह गुरुवारी, 3 सप्टेंबर रोजी आढळून आला. रिपोर्टनुसार. बलजीत सिंग एकटाच राहत होता आणि गेल्या काही दिवसांपासून त्यांच्याकडून कुटुंबाशी कोणताही संपर्क झाला नव्हता. गुरुवारी सकाळी त्यांचा मृतदेह सापडला. प्राथमिक तपासावरून हे हत्येचं प्रकरण असावं असा संशय व्यक्त केला जात आहे. गायकाच्या मृत्यूबद्दल केव्हा कळलं जेव्हा, शेजारच्यांनी, गायकाच्या घरातून दुर्गंधी येऊ लागली. घरातून दुर्गंधी येऊ लागल्यानंतर शेजारच्यांनी पोलिसांना कळवलं.

पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर, ते तात्काळ घटनास्थळी पोहोचले. घराचा दरवाजा तोडल्यानंतर गायकाचा मृतदेह बेडवर पडलेला होता. असं देखील सांगितलं जात आहे की, घरात अनेक ठिकाणी रक्ताचे डाग देखील होते. मृतदेहाची स्थिती पाहता, गायकाचा चार ते पाच दिवस आधीच मृत्यू झाला असावा, असा पोलिसांना संशय आहे.

पोलीस अधिकारी आता पुराव्यांच्या शोधात घर आणि परिसराची तपासणी करत आहेत. तसेच, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी केली जात आहे. सिंह बेपत्ता असतानाच्या कालावधीतील त्यांच्या हालचालींचा मागोवा घेण्याचा आणि त्या काळात गायकाला भेटलेल्या किंवा त्यांच्याशी संपर्क आलेल्या व्यक्तींची ओळख पटवण्याचा प्रयत्न अधिकारी करत आहेत. मृत्यूचं नेमकं कारण शवविच्छेदन आणि पुढील तपासानंतरच समोर येईल असं सांगण्यात आलेलं.

पोलीस तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, गायकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी स्थानिक सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आलेला. प्राथमिक वैद्यकीय रिपोर्टनुसार, बलजीत सिंग याचा मृत्यू हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं झाल्याचं म्हटलं जात आहे. पोलिसांनी सध्या कोणत्याही घातपाताची शक्यता नाकारली आहे. पण, बॉडी ज्या अवस्थेत आढळली, त्या पार्श्वभूमीवर पोलीस सर्व बाजूंनी सखोल तपास करत आहेत.

हरियाणवी गायक अंकित बालियानची हत्या

काही दिवसांपूर्वीच, शामली येथे एका जिमबाहेर हरियाणवी गायक अंकित बालियान यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार, बालियान बाहेर पडत असतानाच हल्लेखोरांनी त्यांच्यावर तब्बल 20 गोळ्या झाडल्या आणि तेथून पळ काढला. यात ते गंभीर जखमी झाले होते आणि त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले; मात्र, रुग्णालयात पोहोचताच गायकाला मृत घोषित करण्यात आलं.

Follow Us
मनसे नेत्याच्या दहीहंडीला पोलिसांनी परवानगी नाकारली
Dahi Handi in Mumbai | कालपर्यंत परवानगी, रात्री अचानक नकार! मनसे नेत्याच्या दहीहंडीला पोलिसांनी परवानगी नाकारली
परदेशात शिकण्याचं स्वप्न पाहणाऱ्या मराठा कुणबी विद्यार्थ्यांना दिलासा!
परदेशात शिकण्याचं स्वप्न पाहणाऱ्या मराठा कुणबी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! सारथी शिष्यवृत्तीवरील खर्च मर्यादेवर मोठा निर्णय
मुंबईत ठाकरे गटाची भव्य दहीहंडी! शिवसेना भवनासमोर गोविंदांचा जल्लोष
Thackeray Group Dahihandi | मुंबईत ठाकरे गटाची भव्य दहीहंडी! शिवसेना भवनासमोर गोविंदांचा जल्लोष बघाच
जरांगेंच्या उपोषणाचा 8वा दिवस! अंतरवली सराटीत आंदोलकांची मोठी गर्दी
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 8वा दिवस! अंतरवली सराटीत मराठा आंदोलकांची मोठी गर्दी
कृष्ण जन्मला गं बाई! देशभर कृष्णजन्माष्टमीचा उत्साह बघाच
कृष्ण जन्मला गं बाई! देशभर कृष्णजन्माष्टमीचा उत्साह; मध्यरात्री बाळकृष्णाचा जन्मसोहळा, मंदिरांमध्ये भाविकांची अलोट गर्दी
मोठी बातमी, ठाकरे गटाला मुंबईत धक्का, विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द
मोठी बातमी, ठाकरे गटाला मुंबईत धक्का, विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द
मतदार यादीतील फेरफारवरून उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर साधला निशाणा
उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप: महाराष्ट्रातून दोन कोटी मतदार वगळले, भविष्यात बनावट मतदारांचा धोका
डीजे परवानगीशिवाय वाजवला, पुण्यातील मंडळाला कोर्टाकडून दोषी ठरवून दंड
पुण्यात जुलूसदरम्यान अनधिकृत डीजे; अल मदिना यंग बॉईज सर्कलला कोर्टाचा दणका
जोरदार पावसामुळे दिल्लीतील प्रमुख मार्गांवर पाणी साचले, वाहतूक मंदावली
दिल्लीत मुसळधार पाऊस: सुब्रतो पार्क परिसरात भीषण वाहतूक कोंडी, जनजीवन विस्कळीत
सोनिया गांधी आत्मचरित्र बिलॉन्गिंग हार्परकॉलिन्स इंडिया प्रकाशित करणार
सोनिया गांधींच्या बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव आत्मचरित्राचा मार्ग मोकळा, हार्परकॉलिन्स करणार प्रकाशन