‘प्यार का पंचनामा’ फेम अभिनेत्रीच्या लग्नातील Inside व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
‘प्यार का पंचनामा’ फेम अभिनेत्रीच्या लग्नातील खास व्हिडीओ व्हायरलमुळे ट्रोल; अभिनेत्रीसोबत पती नाही तर 'या' सदस्याने केला मंडपात प्रवेश.. पाहा व्हिडीओ

मुंबई | ‘प्यार का पंचनामा’ फेम अभिनेत्री सोनाली सेहगल सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेत आली आहे. सोनालीच्या लग्नात कुटुंबिय आणि फक्त मित्र परिवार उपस्थित आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या लग्नाची चर्चा रंगत आहे. अभिनेत्री गेल्या पाच वर्षांपासून डेट करत असलेल्या बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार आहे. बॉयफ्रेंडसोबत अभिनेत्री नवीन आयुष्याला सुरुवात करणार आहे. अभिनेत्रीने लग्न गुपचूप करायचं ठरवलं असलं तरी, सोनालीच्या लग्नातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये सोनाली नवरीच्या रुपात प्रचंड सुंदर दिसत आहे. सोशल मीडियावर सोनालीच्या लग्नातील एक व्हिडीओची तुफान चर्चा रंगत आहे. शिवाय व्हिडीओ पाहिल्यानंतर अभिनेत्रीला अनेकांनी ट्रोल देखील केलं आहे.
सोनालीने गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये नवरीच्या रुपात मंडपात एन्ट्री केली. पण अभिनेत्रीच्या कुटुंबातील एका खास सदस्याने सोनालीसोबत एन्ट्री केल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. सोनाली हिच्यासोबत तिच्या पाळीव कुत्र्याने अभिनेत्रीसोबत एन्ट्री केली. अभिनेत्रीच्या लग्नातील व्हायरल होत असलेल्या व्हिडीओची तुफान चर्चा रंगत आहे. शिवाय अनेकांनी अभिनेत्रीला ट्रोल देखील केलं आहे.
रिपोर्टनुसार, सोनाली आज म्हणजे ७ जून रोजी बॉयफ्रेंड आशिष सजनानी याच्यासोबत लग्न करणार असल्याची माहिती समोर येत आहे. सोनाली आणि आशिष गेल्या पाच ते सहा वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. पण दोघांनी अद्यापही त्यांच्या नात्यावर मौन बाळगलं आहे. सध्या सर्वत्र सोनाली आणि आशिष यांच्या लग्नाची चर्चा सुरु आहे.
View this post on Instagram
मिळालेल्या माहितीनुसार, सोनाली लवकरच तिच्या नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहे. महत्त्वाचं म्हणजे अभिनेत्रीचा होणार पती उद्योजक आहे. आशिष अनेक हॉटेल्सचा मालक आहे. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर आशिष आणि सोनाली यांनी नात्याला पती-पत्नीचं नाव देण्याचा निर्णय घेतला आहे.
‘प्यार का पंचनामा’ सिनेमाने चाहत्यांचं भरभरुन मनोरंजन केलं. आज ही सिनेमाची चर्चा चाहत्यांमध्ये रंगलेली असते. शिवाय सिनेमातील कलाकार देखील त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतात. आता ‘प्यार का पंचनामा’ सिनेमातून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री लग्न बंधनात अडकणार आहे..
सोनालीने २०११ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘प्यार का पंचनामा’ मधून तिच्या बॉलिवूड करिअरची सुरुवात केली होती. हा सिनेमाचं दिग्दर्शन लव रंजन यांनी केलं होतं. यानंतर सोनाली ‘प्यार का पंचनामा २’ मध्येही दिसली होती. अभिनेत्रीने ‘वेडिंग पुलाव’मध्येही महत्त्वाची भूमिका साकारली होती. एवढंच नाही तर, सोनालीने अभिनेता सलमान खानसोबत थम्स अपच्या जाहिरातीतही दिसली होती.
