Radhika Apte: मामासोबतच लग्न केल्याचा पश्चाताप, प्रचंड तिरस्कार वाटलेला पण…, राधिका आपटेचा मोठा खुलासा

Radhika Apte: अभिनेत्री राधिका आपटे हिने नुकता झालेल्या एका मुलाखतीत मोठा खुलासा केला आहे. 'मामासोबतच लग्न केल्याचा पश्चाताप...', असं वक्तव्य अभिनेत्रीने केलं होतं. तर जाणून घ्या राधिका आपटे असं म्हणाली तरी का? सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त राधिका आपटे हिच्या वक्तव्याची चर्चा रंगलीआहे.

Radhika Apte: मामासोबतच लग्न केल्याचा पश्चाताप, प्रचंड तिरस्कार वाटलेला पण..., राधिका आपटेचा मोठा खुलासा
अभिनेत्री राधिका आपटे
| Updated on: Nov 04, 2026 | 12:30 PM

Radhika Apte: अभिनेत्री राधिका आपटे हिने फक्त मराठीच नाही तर, बॉलिवूड आणि इतर सिनेविश्वात देखील महत्त्वाच्या भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आता राधिका नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या ‘अक्का’ सीरिजमुळे चर्चेत आहेत. सीरिजमध्ये अभिनेत्री किर्ती सुरेश देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसत असून राधिका आणि किर्ती सध्या सीरिजचं दमदार प्रमोशन करत आहे. याच दरम्यान राधिका हिने असा खुलासा केला, ज्यामुळे सर्वत्र चर्चांना उधाण आलं आहे. यावेळी राधिका हिने दाक्षिणात्य सिनेविश्वावर निशाणा साधला आहे. सांगायचं झालं तर, किर्ती साऊथ इंडस्ट्रीमधील आहे, तर राधिका हिने बॉलिवूडमध्ये अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. तिने दक्षिण भारतीय सिनेमांमध्येही काम केलं आहे. तिने काही तेलुगू सिनेमांत काम केलं, जिथे तिचा अनुभव अपेक्षेप्रमाणे राहिला नाही.

एका मुलाखतीती राधिका आपटेने अशाच एका सिनेमाचा उल्लेख केला, ज्यामध्ये तिला तिच्या मामाशी लग्न करावं लागलं होतं. राधिका म्हणाली, ‘मी एका तेलुगू सिनेमात काम केलं होतं. ज्यामध्ये मला माझ्या मामासोबतच संसार थाटावा लागला. ती माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण भूमिका होती. सिनेमातील प्रत्येक गोष्टीचा मला तिरस्कार होता..’

Loading...

राधिका हिचं असं वक्तव्य ऐकून किर्ती हैराण झाली आणि विनोदी अंदाजात म्हणाली, ‘तामिळ आणि तेलुगू सिनेमांमध्ये मामासोबत लग्न फार सामान्य आहे… तेथे ही फार सामान्य गोष्ट आहे. जेथे भूमिकेचं लग्न तिच्या मानासोबत केलं जातं…’, यावर राधिका म्हणाली, ‘हो मला मान्य आहे… पण याशिवाय मला माझ्यापेक्षा मोठ्या अभिनेत्यासोबत रोमान्स कराावा लागला… तिथलं वातावरण आणि मानसिकता बऱ्यापैकी पितृसत्ताक होती. माझ्यासाठी ही सर्वात कठीण गोष्ट होती. शिवाय, सिनेमाच्या मध्यंतरीच माझं पात्र मृत पावतं. यात एका व्यक्तीला मला खांद्यावर उचलून घेऊन एक ऍक्शन सीन करायचा होता. माझ्या मनात सतत हा प्रश्न येत होता की, “माझं पात्र नेमकं कधी मरणार आहे?’ असं देखील राधिका म्हणाली.

कोणत्या सिनेमाबद्दल बोलत होती राधिका?

राधिकाने मुलाखतीत सिनेमाचं नाव सांगितलं नाही. परंतु तिने ज्या सिन्सचा उल्लेख केला, त्यावरून हे स्पष्ट होतं की ती बोयापती श्रीनू यांच्या 2014 मध्ये आलेल्या ‘लीजेंड’ या सिनेमाबद्दल बोलत होती, ज्यामध्ये नंदमुरी बालकृष्ण होते. या सिनेमात राधिकाच्या भूमिकेला तिच्या मामाच्या मुलावर म्हणजेच ‘बावा’वर प्रेम होतं. तेलगू आणि तमिळ राज्यांमध्ये अशा प्रकारच्या नात्यांसंदर्भात परंपराही राहिली आहे. ‘लीजेंड’ सिनेमा जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा बालकृष्ण 54 वर्षांचे होते, तर राधिका आपटेचं वय 29 वर्षे होतं. दोघांमध्ये 25 वर्षांचे अंतर होतं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us