AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pariniti Chopra : साखरपुड्याच्या चर्चा रंगात असताना ‘या’ ठिकाणी एकत्र दिसले परिणीती राघव चड्डा; फोटो पाहून तुम्हीही म्हणाल…

Raghav Chadha And Parineeti Chopra: एंगेजमेंटच्या बातम्यांमुळे चर्चेत असलेले राघव चढ्ढा आणि परिणीती चोप्रा आयपीएल मॅच पाहण्यासाठी एकत्र आले होते.

Pariniti Chopra : साखरपुड्याच्या चर्चा रंगात असताना 'या' ठिकाणी एकत्र दिसले परिणीती राघव चड्डा; फोटो पाहून तुम्हीही म्हणाल...
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: May 04, 2023 | 12:32 AM
Share

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आपचे खासदार राघव चड्ढा यांच्या लग्नाच्या चर्चा सुरू आहेत. मुंबईत ते दोघं अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत तेव्हापासून त्या दोघांच्या डेटींगच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. तसंच लवकरच परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांची एंगेजमेंट होणार असल्याचं म्हटलं जातंय. अशातच आता पुन्हा एकदा या दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे.

एंगेजमेंटच्या चर्चा सुरू असतानाच राघव चढ्ढा आणि परिणीती चोप्रा पुन्हा एकदा एकत्र दिसले आहेत. हे दोघं आयपीएल मॅच पाहण्यासाठी एकत्र आले होते. पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्सच्या मॅचमध्ये या दोघांना पुन्हा एकदा एकत्र स्पॉट करण्यात आलं.

परिणीती आणि राघव चड्ढा स्टेडियममध्ये एकत्र दिसले तेव्हा चाहत्यांमध्ये उत्साह संचारला होता. तसंच सध्या या दोघांचे स्टेडियममधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये परिणीती आणि राघव चड्ढांनी एकाच रंगाचे कपडे परिधान केलेले दिसत आहेत. तसंच दोघेही एकत्र खूप आनंदी दिसत आहेत.

राघव-परिणीती प्रसिद्धीझोतात कसे आले?

मार्चमध्ये परिणिती चोप्रा आणि राघव चढ्ढा हे एकत्र डिनरसाठी स्पॉट झाले होते. तेव्हापासून हे दोघं एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. त्यानंतर दोघंही अनेकदा एकत्र दिसले आहेत. मात्र, अद्याप या दोघांपैकी कोणीही या नात्याला दुजोरा दिलेला नाही.

या दिवशी होऊ शकते एंगेजमेंट

मागील काही दिवसांपासून परिणीती आणि राघव यांच्या एंगेजमेंटच्या चर्चा होत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हे दोघंही याच महिन्यात एंगेजमेंट करणार आहेत. तसंच त्यांच्या एंगेजमेंटची तारीखही समोर आली आहे. असं म्हटलं जातंय की, 13 मे रोजी राघव-परिणीती यांची एंगेजमेंट होणार आहे.  मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृतपणे माहिती समोर आलेली नाही.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?