AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raid 2 OTT Release : अजय देवगणचा ‘रेड 2’ आता ओटीटीवर पाहता येणार; तारीख लक्षात ठेवा..

अजय देवगणच्या 'रेड 2' या चित्रपटाला थिएटरमध्ये प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची तारीख निश्चित झाली आहे. हा चित्रपट तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता, ते जाणून घ्या..

Raid 2 OTT Release : अजय देवगणचा 'रेड 2' आता ओटीटीवर पाहता येणार; तारीख लक्षात ठेवा..
अजय देवगणImage Credit source: Instagram
| Updated on: Jun 25, 2025 | 2:00 PM
Share

अजय देवगणची मुख्य भूमिका असलेला ‘रेड 2’ हा चित्रपट 1 मे 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. बॉक्स ऑफिसवरील दमदार कमाईनंतर आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट थिएटरमधून बाहेर पडला असून आता कोणत्या प्लॅटफॉर्मवर तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे. याबद्दलची माहिती नुकतीच समोर आली आहे. अजय देवगणचा ‘रेड 2’ हा चित्रपट त्याच्याच ‘रेड’ या चित्रपटाचा सीक्वेल आहे. 2018 मध्ये पहिला भाग प्रदर्शित झाला होता. त्यामध्ये अजयसोबत अभिनेत्री इलियाना डिक्रूझ झळकली होती. आता सीक्वेलमध्ये अजयसोबत रितेश देशमुख आणि वाणी कपूर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने 225.5 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. या वर्षी सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत ‘रेड 2’ने स्थान मिळवलंय.

एखादा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्याच्या जवळपास चार आठवड्यानंतर तो ओटीटीवर स्ट्रीम केला जातो. परंतु जर एखादा चित्रपट थिएटरमध्ये खूप चांगली कामगिरी करत असेल, तर ओटीटी स्ट्रिमिंगची तारीख पुढेही ढकलली जाऊ शकते. थिएटरमधील कमाईसाठी पुरेसा वेळ दिल्यानंतरच तो ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीला आणला जातो.

ओटीटीवर कधी स्ट्रीम होणार ‘रेड 2’?

‘रेड 2’ हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. येत्या 26 जून रोजी अजय देवगणचा हा चित्रपट ओटीटीवर स्ट्रीम होणार आहे. म्हणजेच तुम्ही आता हा चित्रपट घरीबसल्या आरामात पाहू शकता. नेटफ्लिक्सने या चित्रपटाचा पोस्टर शेअर करत स्ट्रीमिंगची तारीख जाहीर केली आहे. ‘आज से उल्टी गिनती शुरू.. अमय पटनायक एका नवीन केस आणि त्याच जुन्या जोशाने परत येतोय’, असं कॅप्शन लिहित नेटफ्लिक्सने स्ट्रीमिंगच्या तारखेबद्दलची माहिती दिली आहे.

‘मैदान’, ‘औरों में कहां दम था’, ‘सिंघम अगेन’, ‘नाम’ आणि ‘आझाद’ यांसारखे चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर अजयने ‘रेड 2’च्या निमित्ताने षटकार मारल्याचं म्हटलं गेलं. एका प्रामाणिक अधिकाऱ्याचा सामना जेव्हा भ्रष्ट राजकारण्याशी होतो, तेव्हा काय घडतं याची कथा या चित्रपटात पहायला मिळते. यामध्ये यशपाल शर्मा, अमित सियाल आणि बृजेंद्र काला यांनीसुद्धा विशेष छाप सोडली आहे. चित्रपटात रितेशच्या आईची भूमिका साकारणाऱ्या सुप्रिया पाठक आणि अजयच्या बॉसच्या भूमिकेतील रजत कपूर यांनीही उल्लेखनीय काम केलं.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.