Raja Shivaji: रितेशच्या लेकाची कमाल! ‘राजा शिवाजी’ सिनेमातील भूमिकेने वेधले लक्ष, ट्रेलर नक्की पाहा

Raja Shivaji: सध्या सगळीकडे अभिनेता रितेश देशमुखचा सिनेमा 'राजा शिवाजी' सध्या सगळीकडे चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून रितेशच्या लेकाने देखील पदार्पण केले आहे.

Raja Shivaji: रितेशच्या लेकाची कमाल! राजा शिवाजी सिनेमातील भूमिकेने वेधले लक्ष, ट्रेलर नक्की पाहा
Raja Shivaji cinema
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Apr 20, 2026 | 7:05 PM

गेल्या काही दिवसांपासून अभिनेता रितेश देशमुखचा आगामी चित्रपट ‘राजा शिवाजी’ चर्चेत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली होती. आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. या चित्रपटातून रितेश देशमुखच्या लेकाने फिल्म इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले आहे. तसेच रितेशची पत्नी जिनिलिया चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे.

काय आहे कथा?

‘राजा शिवाजी’ या चित्रपटाच्या तीन मिनिटांच्या ट्रेलरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध कसा केला? हिंदवी स्वराज्याची स्थापना कशी झाली? हे दाखवण्यात आले आहे. चित्रपटातील प्रत्येक सीन पाहाताना अंगावर अक्षरश: काटा येतोय. ट्रेलर पाहिल्यानंतर आता चाहत्यांमध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनाची उत्सुकता वाढली आहे.

रितेशच्या लेकाचा डेब्यू

‘राजा शिवाजी’ चित्रपटात रितेश देशमुखने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. रितेशची पत्नी अभिनेत्री जिनिलिया देशमुख सिनेमात महाराणी सईबाईंची भूमिका साकारात आहे. जिनिलिया सिनेमाची निर्माती देखील आहे. या सिनेमातून रितेश देशमुखचा धाकटा मुलगा राहिल देशमुख डेब्यू करतोय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणीची भूमिका राहिल साकारत आहे. राजा शिवाजी सिनेमाच्या ट्रेलरच्या सुरुवातीच राहिलची छोटी झलक पाहायला मिळाली.

कधी होणार प्रदर्शित

सध्या सगळीकडे ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाची चर्चा रंगली आहे. या चित्रपटात रितेश देशमुख, जिनिलिया देशमुख, अभिषेक बच्चन, विद्या बालन, भाग्यश्री, बोमन इराणी, फरदीन खान, संजय दत्त, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर अशी हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीतील तगडी स्टारकास्ट दिसणार आहे. तसेच हा चित्रपट 1 मे रोजी रोजी प्रदर्शित होणार आहे.

Follow Us