‘मीच फक्त घाणेरडा आहे….’;दारू प्यायल्यानंतर राजेश खन्ना यांचे रूप बदलायचे, प्रेयसीवर असा काढायचे राग

राजेश खन्ना हे जेव्हा जेव्हा दारू प्यायचे तेव्हा त्यांचा स्वभाव खूप बदलत असे. ते चिडचिड करायचे, लहानसहान गोष्टींवर रागवायचे आणि त्यांच्या नातेसंबंधांवरही याचा परिणाम झाला. त्यांच्या प्रेयसीनेच याचा खुलासा केला.

मीच फक्त घाणेरडा आहे....;दारू प्यायल्यानंतर राजेश खन्ना यांचे रूप बदलायचे, प्रेयसीवर असा काढायचे राग
Rajesh Khanna Dark Side, Anita Advani Reveals Shocking Truths
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 16, 2025 | 6:43 PM

राजेश खन्ना त्यांच्या काळातील सर्वात लोकप्रिय सुपरस्टारपैकी एक होते. लोक त्यांच्या अभिनयाचे वेडे होते. त्यांचासारखा स्टारडम त्यावेळी तरी कोणीच पाहिला नसेल. पण ते जेवढे मोठे सुपस्टार होते. तेवढ्याच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात अडचणी होत्या. जेव्हा त्यांचे स्टारडम हळूहळू कमी होऊ लागले तेव्हा त्यांचा स्वभावही बदलू लागला. त्यांच्या वागण्याचा परिणाम त्यांच्या आजूबाजूच्या लोकांवर होऊ लागला, कारण दारू प्यायल्यानंतर ते चिडचिड करायचे आणि रागावायचे.

काही पेये घेतल्यानंतर ते आक्रमक आणि रागावायचे.

अलीकडेच, एका मुलाखतीत त्यांची कथित प्रेयसी अनिता अडवाणीने दिवंगत अभिनेते राजेश खन्ना यांच्याबद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले. अनिता म्हणाली, ‘मी 2000 मध्ये त्यांच्यासोबत राहू लागले. त्यावेळी ते खूप शांत असायचे, पण ड्रिंक केली के ते आक्रमक व्हायचे आणि रागावायचे.’

ते लहानसहान गोष्टींमुळे चिडायचे

त्या म्हणाल्या ‘मला वाटत नाही की त्यांच्या कारकिर्दीबद्दल ते निराश होते, पण ते लहानसहान गोष्टींमुळे चिडायचे आणि कोणी काही बोलले तर खूप लवकर रागवायचे. ते त्यावेळी फक्त त्यांचा राग काढत असायचे.  कारण त्यांच्या मनावर स्टारडमचं खूप ओझं असायचं.’

अनिता अडवाणी पुढे म्हणाल्या, ‘राग कुठेतरी बाहेर काढायचा असायचा म्हणून ते माझ्यावर राग काढायचे . त्यांच्या इतके स्टारडम इतर कोणीही पाहिले नव्हते. ते त्यांच्या कारकिर्दीच्या शिखरावर होते. पण जेव्हा तुम्ही त्या उंचीवरून खाली येता तेव्हा स्वाभाविकपणे नैराश्य येतं आणि रागही वाढतो त्यांचंही तसंच झालं होतं.’

‘मी तुझ्याशी भांडणार नाही तर मी कोणाशी भांडू?’

त्या म्हणाला, ‘मानसिकदृष्ट्या, त्यांना फक्त त्यांच्या सर्व आंतरिक भावना व्यक्त करण्याचा मार्ग हवा होता. ते मला म्हणायचे की जर मी तुझ्याशी भांडणार नाही तर मी कोणाशी भांडू? एकदा फक्त मी त्यांना म्हटलं की तुमची रुम किती घाणेरडी आहे, असे म्हटल्यामुळे ते चिडले. अन् म्हणाले मीच घाणेरडा आहे, फक्त तूच स्वच्छ आहेस. पण त्यांनी मला कधीही शारीरिक इजा केली नाही, मी काही चुकीचं बोलले किंवा केलं तर ते गंमतीने मला हलकेच मारायचे. पण ते कधीही हिंसक झाले नाही.’

मी एक डायरी लिहायचे

अनिता म्हणाल्या की त्या राजेश खन्नांसोबत खूप भांडायच्या. त्या म्हणाल्या, ‘आम्ही खूप भांडायचो, आणि आम्ही किती वेळा वाद घातला हे मी मोजूही शकत नाही. मी एक डायरी लिहायचे आणि मला वाटते की मी त्यात फक्त आमच्या भांडणांबद्दल लिहिले आहे. मी माझ्या बहिणीच्या घरी जायचे आणि त्यांचा फोन उचलण्यास नकार द्यायचे.’

“राजेश खन्ना तिला पटवून देण्यासाठी त्यांचे कर्मचारी पाठवत असत”

त्या म्हणाल्या की राजेश खन्ना त्यांना पटवून देण्यासाठी त्यांचे कर्मचारी पाठवत असत. , ‘ते त्यांच्या कर्मचाऱ्यांपैकी एकाला पाठवत असे जो एक मोठा हॅम्पर आणि एक छोटी चिठ्ठी आणत असे. मी काहीही न घेता आणि पत्र न वाचता ते परत पाठवत असे. मग काही दिवसांनी ते मला पटवून द्यायचे तेव्हा मी सहमत व्हायचे आणि त्यांच्याकडे परत जायचे. कारण मलाही त्यांची आठवण यायची”

तर अशा प्रकारे अनिता यांनी त्यांच्याबदद्ल आणि राजेश खन्नांच्या नात्याबद्दलच्या सगळ्याच बाजूंबद्दल सांगितलं.