AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘गब्बरच्या हातावर एक काळी मुंगी…’ शोलेमधून सचिन पिळगांवकरांचा हा सीन काढून टाकण्यात आला; गब्बरसोबत झाला होता शूट

शोले चित्रपट म्हणजे आजही आयकॉनिक चित्रपट म्हणून त्याकडे पाहिलं जातं. या चित्रपटात सचिन पिळगांवकरांचा एक खास सीन होता जो नंतर काढून टाकण्यात आला. त्याबद्दल सचिन पिळगांवकरांना आजही वाईट वाटतं.   

'गब्बरच्या हातावर एक काळी मुंगी...' शोलेमधून सचिन पिळगांवकरांचा हा सीन काढून टाकण्यात आला; गब्बरसोबत झाला होता शूट
Sholay cut scene, a scene of Sachin Pilgaonkar shot with Gabbar removed from the filmImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 16, 2025 | 3:51 PM
Share

बॉलिवूडचा आयकॉनिक चित्रपट ‘शोले’ला 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. या चित्रपटातील सर्वच कलाकारांची आठवण आजही प्रेक्षकांच्या मनात कायम आहे. चित्रपटातील अनेक कलाकार मुलाखतींमध्ये चित्रपटांचे किस्से सांगताना दिसतात. असाच एक किस्सा अभिनेते सचिन पिळगावकर यांनीही सांगितला. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी सांगितलं की त्यांचा शोलेमधला एक सीन काढून टाकण्यात आला होता त्यामुळे त्यांना फार वाईट वाटलं होतं.

त्या सीनमध्ये सचिनला मारण्यात आलं होतं 

चित्रपटात अभिनेता सचिन पिळगांवकर यांनी रहीम चाचा यांच्या मुलाची भूमिका साकारली होती. ज्याबद्दल त्यांनी एक खास गोष्ट सांगितली आहे. सचिनने सांगितले की, दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी चित्रपटातून त्यांचा खास सीन काढून टाकला होता आणि त्यामागे अनेक कारणे होती. सचिन म्हणाले की, “ज्या सीनमध्ये मला मारण्यात आलं ते गब्बरचा जो अड्डा होता त्या ठिकाणी हा सीन चित्रित करण्यात आला होता, परंतु रमेश यांनी काही कारणांमुळे एडिटिंग दरम्यान हे सीन काढून टाकला”

माझ्या पात्राचा मृतदेह गावात दाखवला जातो…

पुढे ते म्हणाले की, “पहिलं कारण म्हणजे चित्रपट खूप लांबत होता, ज्यामुळे तो काढून टाकावा लागला आणि दुसरे म्हणजे, दिग्दर्शक रमेशला वाटले की 16-17 वर्षांच्या मुलाची हत्या दाखवणे खूप विचित्र वाटेल. त्यानंतर शेवटच्या सीनमध्ये गब्बरच्या हातावर एक काळी मुंगी चालताना दिसते, जी पाहून गब्बर म्हणतो, “रामगढ का बेटा आया है,” आणि नंतर तो त्या मुंगीला मारतो. यानंतर, माझ्या पात्राचा मृतदेह गावात दाखवला जातो, ज्यावरून माझ्या पात्राची हत्या झाल्याचे दिसून येते.”

सीन कापल्यामुळे सचिन पिळगांवकर दुःखी झाले

सचिन पिळगांवकर म्हणाले की, त्यावेळी त्यांना असे वाटायचे की ते एक अभिनेता आहेत. ‘शोले’ मधील तो सीन कट झालेला पाहून ते फार दु:खी झाले होते. ते म्हणाले, “त्यावेळी मला खूप वाईट वाटले कारण गब्बरसोबत माझा एक खास सीन होता आणि तो काढून टाकण्यात आला होता. कोणत्याही कलाकाराला असेच वाटेल.’

सचिन पिळगावकर यांनी रमेश सिप्पी यांचे कौतुकही केले

सचिन यांनी दिग्दर्शक आणि निर्मात्याच्या दृष्टिकोनातून रमेश सिप्पी यांच्या निर्णयाचे कौतुकही केले, ते म्हणाले “पण आज जेव्हा मी स्वतः एक दिग्दर्शक आहे, तेव्हा मला समजतं की रमेशजींनी जे केलं ते बरोबर केलं होतं”

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.