‘एक नंबर, तुझी कंबर…’ लाल रंगाची साडी, केसात गजरा; जब्याच्या शालूचा जबरदस्त डान्स; वजन वाढल्यामुळे ट्रोल
'फँड्री' मधील शालू म्हणजे राजेश्वरी खरात पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिचा एक डान्सचा व्हिडीओ सध्या प्रचंड चर्चेत आला असून त्या व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस पडत आहे.

सध्या मराठी अभिनेत्रींपैकी सोशल मीडियावर सध्या चर्चेत असलेली अभिनेत्री म्हणजे राजेश्वरी खरात अर्थातच ‘फँड्री’ चित्रपटातील शालू. राजेश्वरीने काही महिन्यांपूर्वीच हिंदूमधून ख्रिश्चन धर्म स्वीकारला. यानंतर तिला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केलं गेलं. तिने ट्रोलर्सला सडतोड उत्तरेही दिली पण अखेर तिला कमेंट्स आणि ट्रोलिंगला कंटाळून तिचे इंस्टाग्रामवरील कमेंट बॉक्स हाईड करावा लागला. पण अखेर आता जारेश्वरीने पुन्हा एकदा हाईड केलेला कमेंट्स बॉक्स सुरु केला आहे. तसेच ती नेहमी प्रमाणेच सोशल मीडियावर सक्रिय झाली आहे.
राजेश्वरी डान्स व्हिडीओमुळे चर्चेत
आता राजेश्वरी पुन्हा एकदा तिच्या व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. तिच्या एका डान्सच्या व्हिडीओमुळे ती चर्चेत आली आहे. 2014 साली नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘फँड्री’ चित्रपटातून जब्या आणि शालू हे कलाकारही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. सिनेमा रिलीज होऊन इतके वर्ष उलटले असले तरी हे कलाकार आजही तितकेच चर्चेत येत असतात. सिनेमात जब्याची भूमिका सोमनाथ अवघडेने साकारली आहे तर शालूची भूमिका राजेश्वरी खरातने.
‘एक नंबर, तुझी कंबर…’ या गाण्यावर थिरकतानाचा व्हिडीओ
दरम्यान आता तिने संजू राठोडच्या ‘एक नंबर, तुझी कंबर…’ या गाण्यावर थिरकतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. तिच्या या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.या व्हिडिओत ती जबरदस्त अदा करताना आणि ठसकेबाज डान्स करताना दिसते. लाल रंगाची साडी, केसात गजरा अशा मराठमोळ्या लूकमध्ये तिने हा डान्स केलाय. एका व्हॅनिटी व्हॅनमध्ये ती हा डान्स करताना दिसत आहे. तिच्या या डान्सच्या व्हिडीओवर अक्षरशः कमेंटचा पाऊस पडत आहे. काहींनी तिला चांगलं म्हटलं तर काहींनी तिचं वजन वाढल्यामुळे ट्रोल केलं. तसेच राजेश्वरीने याआधीही अशाच एका ट्रेंडिंग ‘शेकी शेकी’ या गाण्यावर रील बनवलं होते. तिचं हे रील देखील प्रचंड व्हायरल झालं होतं.
View this post on Instagram
राजेश्वरी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिच्या इंस्टाग्रामवर तिचे फोटोशूट्स, फॅशन लूक, आणि डान्स रील्स सतत अपडेट होत असतात. ती आता एक सोशल मीडिया इन्फ्लुएंसर म्हणूनही ओळखली जाते.
