AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rajinikanth | योगी आदित्यनाथ यांच्या पाया का पडले ? खुद्द रजनीकांत यांनीच केला खुलासा…

अभिनेते रजनीकांत हे योगी आदित्यनाथ यांच्या पाया पडल्यानंतर विविध स्तरातून टीका होत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आता या मुद्यावर खुद्द रजनीकांत यांनीच स्पष्टीकरण दिले आहे.

Rajinikanth | योगी आदित्यनाथ यांच्या पाया का पडले ? खुद्द रजनीकांत यांनीच केला खुलासा...
| Updated on: Aug 22, 2023 | 11:38 AM
Share

चेन्नई| 22 ऑगस्ट 2023 : ‘थलायवा’ या नावाने प्रसिद्ध असलेले अभिनेते रजनीकांत (Rajinikanth) यांची क्रेझ फक्त साऊथमध्येच नव्हे तर बॉलिवूडमध्येही असून त्यांचे कोट्यावधी चाहते आहेत. रजनीकांत यांचा ‘जेलर’ (jailer) हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून बॉक्स ऑफीसवर मोठा गल्ला कमावला आहे. मात्र रजनीकांत हे केवळ या चित्रपटामुळेच नव्हे तर आणखी एका गोष्टीमुळे चर्चेत आहेत, ते म्हणजे त्यांची व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट.

काही दिवसांपूर्वी रजनीकांत यांनी योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली होती, त्या भेटीचा एका व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला होता. त्यामध्ये कारमधून उतरल्यानंतर रजनीकांत हे योगी आदित्यनाथ यांच्या पायांना स्पर्श करताना दिसत होते. त्यावरून ते बरेच ट्रोल झाले. कारण योगी आदित्यनाथ हे रजनीकांत यांच्यापेत्रक्षा सुमारे 20 वर्षांनी लहान आहेत, त्यामुळेच लोकांनी त्याना ट्रोल केले. मात्र आता खुद्द रजनीकांत यांनीच या कृतीमागचे कारण स्पष्ट केले आहे.

काय म्हणाले रजनीकांत ?

उत्तप प्रदेशचा दौरा संपवून रजनीकांत चेन्नई एअरपोर्टला पोहोचल्यानंतर पत्रकारांनी त्यांना घेरले. त्यांचे बहुतांश प्रश्न हे योगी आदित्यनाथ यांच्याशी संबंधित होते. रजनीकांत हे त्यांच्या पाया का पडले, असाच प्रश्न बहुतांश पत्रकारांनी त्यांना विचारला असता अखेर त्यांनी यावर खुलासा केला. ‘ ही माझी सवय आहे. मला जर कोणीही योगी किंवा संन्यासी दिसले तर मी त्यांच्या पायांना स्पर्श करून (त्यांचा) आशीर्वाद घेतो,’ असे रजनीकांत यांनी स्पष्ट केले.

लोकांनी केली होती टीका

ते (समोरील व्यक्ती) माझ्यापेक्षा लहान असले तरी काय झालं, ते जर योगी किंवा संन्यासी असती तर मी त्यांचा आशीर्वाद जरूर घेतो, ही माझी सवयच आहे, असं रजनीकांत पुढे म्हणाले. रजनीकांत यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या पायांना स्पर्श केल्यावर विविध स्तरातून प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. 72 वर्षांच्या अभिनेत्याने त्यांच्यापेक्षा 20 वर्षांनी लहान असलेल्या आदित्यनाथ यांच्या पायांना हात लावणे योग्य होते का, असा सवाल अनेकांनी विचारला. रजनीकांत यांना बरंच ट्रोल करण्यात आलं, अनेक चाहत्यांनी नाराजीही व्यक्त केली होती.

रजनीकांत हे त्यांचा ‘जेलर’ हा चित्रपट योगी आदित्यनाथ यांच्यासोबत पाहणार होते. भेटीच्या आधी दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी याविषयीची माहिती दिली होती. लखनऊमधील चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगला उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्यासुद्धा पोहोचले होते. त्यांनीही चित्रपटातील कलाकारांचं कौतुक केलं. दरम्यान ‘जेलर’ हा तिसरा सर्वाधिक कमाई करणारा तमिळ चित्रपट ठरला आहे.

Follow Us
उदय सामंत: 'एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य'
उदय सामंत: एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य
मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे
'मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे', रिक्षाचालकांच्या मराठी सक्तीवरून शिंदेंची प्रतिक्रिया
मराठी न बोलल्यास परवाना रद्द करण्याच्या धमक्यांवरचा दुबेंचा इशारा
संजय दुबे यांचा प्रताप सरनाईक यांच्या मराठी भाषेच्या सक्तीला थेट विरोध
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल:
शरद पवार एनडीएमध्ये जाणार नाहीत, विरोधातच राहणार
पवारांकडून एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा फेटाळल्या; पक्ष कार्यकर्त्यांना दिले स्पष्ट निर्देश
देशमुखांचं कारागृह महानिरीक्षकांना पत्र; गैरप्रकारांच्या चौकशीची मागणी
धनंजय देशमुखांचे बीड कारागृह महानिरीक्षकांना पत्र: गैरप्रकार चौकशी आणि आरोपी स्थलांतराची मागणी
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर? ठाण्यातील कार्यक्रमात भाजप नेत्यांची अनुपस्थिती
बेस्ट कामगारांचा बेमुदत संप; प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
बेस्ट कामगारांचा मंगळवारपासून बेमुदत संप: प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
पालकमंत्री महाजनांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना मदत
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना अवयव प्रत्यारोपणासाठी मदत