
सुपरस्टार रजनीकांत हे फिल्म इंडस्ट्रीत अभिनेते म्हणून काम करण्याआधी बरीच वर्षे बस कंडक्टरची नोकरी करत होते, हे अनेकांनाच ठाऊक असेल. आता बऱ्याच वर्षांनंतर रजनीकांत यांनी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

रजनीकांत हे बेंगळुरूमधील बँगलोर मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (BMTC) बस स्टँडवर काम करायचे. मंगळवारी यांनी त्यांनी इथल्या बस डेपोला भेट दिली आणि तिथल्या कर्मचाऱ्यांसोबत काही वेळ घालवला.

72 वर्षीय रजनीकांत यांनी बस स्टँडचे ड्रायव्हर, कंडक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांना सरप्राइज भेट दिली. या भेटीचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

रजनीकांत जसे ट्राफिक ट्रान्झिट मॅनेजमेंट सेंटरला पोहोचले, तसं संपूर्ण BMTC स्टाफने त्यांच्याभोवती घोळका केला. यावेळी अनेकांनी त्यांच्या पायांना स्पर्श करत आशीर्वादसुद्धा घेतला.

बस कंडक्टर म्हणून काम करताना सहकर्मचारी आणि बस ड्राइव्हर पी. राज बहादूर यांनी रजनीकांत यांच्यातील अभिनयकौशल्याला प्रोत्साहन दिलं. त्यामुळे रजनीकांत आपल्या यशाचं श्रेय त्यांना देतात.