AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाईजानसोबत काम करण्याचं हिरानींचं स्वप्न ? पण एका गोष्टीमुळे रखडलं दोघांचं काम

राजकुमार हिरानी यांनी नुकतीच सलमान खानसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. २३ वर्षांच्या कारकिर्दीत दोघांनी कधीच एकत्र काम केलं नाही, आमिर आणि शाहरुखसोबत काम केलेल्या हिरानींना 'दबंग' सलमानसोबत काम करण्याची अजूनही प्रतीक्षा आहे.

भाईजानसोबत काम करण्याचं हिरानींचं स्वप्न ? पण एका गोष्टीमुळे रखडलं दोघांचं काम
Salman Khan and Rajkumar Hirani
| Updated on: Aug 27, 2026 | 9:57 PM
Share

Rajkumar Hirani On Working With Salman Khan : बॉलिवूडचा दबंग स्टार अर्थात सलमान खान ( Salman Khan ) हा गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूड गाजवतोय.  त्याने आत्तापर्यंत कित्येत चित्रपट केले असून अनेक दिग्दर्शकांसोबतही काम केलं आहे. पण बॉलिवूडमधल्या एका नामवंत दिग्दर्शकासोबत मात्र सलमानची जोडी कधीच मोठ्या पडद्यावर दिसली नाही,  त्यांचं नाव – राजकुमार हिरानी.  गेल्या 23 वर्षांपासून राजकुमार हिरानी हे बॉलिवूडमध्ये कार्यरत आहेत. 2003 साली आलेल्या ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ चित्रपटाद्वारे त्यांनी हिंदी चित्रपटसृ्ष्टीत पदार्पण केलं. आत्तापर्यंतच्या करिअरमध्ये त्यांनी संजय दत्त, रणबीर कपूर, शाहरुख खान, आमिर खान यांसारख्या एकाहून एक मोठ्या स्टार्ससोबत काम केलंय. पण बॉलिवूडचा भाईजान, म्हणजेच सलमान खान याच्यासोबत त्यांचा एकही चित्रपट नाही.  राजकुमार हिरानी आणि सलमान या दोघांनी आत्तापर्यंत एकाही प्रोजेक्टमध्ये काम केलेलं नाही, मात्र सलमानसोबत काम करण्याची इच्छा हिरानी यांनी नुकतीच बोलून दाखवली.

काय म्हणाले राजू हिरानी ?

अलीकडे एका वृत्तसंस्थेला हिरानी यांनी मुलाखत दिली, तेव्हा भविष्यात (तुम्ही) सलमान खानसोबत काम करण्याची शक्यता आहे का ?, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर राजू हिरानी यांनी स्पष्टपणे सांगितलं की,’ मला सलमानसोबत काम करायला नक्कीच आवडेल.  आमची कधी भेट झालेली नाही असं नव्हे, आम्ही काही वेळा भेटलोय ना. पण अजून अशी स्क्रीप्ट मिळालेली नाही, भविष्यात कधी असं घडलं, तर.. ‘ असं हिरानी म्हणाले.

योग्य स्क्रीप्टच्या शोधात

राजकुमार हिरानी यांच्या वक्तव्यावरून हे तर स्पष्ट होतं की दोघांनाही एकत्र काम करण्याची इच्छा आहे. त्या दोघांच्या आत्तापर्यंत काही भेटीही झाल्या, पण एकत्र येऊन काम करता येईल, अशी योग्य स्क्रीप्ट मिळालेली नाही. म्हणजेच भविष्यात जर अशी एखादी स्क्रिप्ट तयार झाली, जी सलमानलाही आवडेल आणि हिरानी यांनाही योग्य वाटेल, तर ते दोघे एकत्र येण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

राजकुमार हिरानी यांनी आत्ताप्रयंत आमिर आणि शाहरुख या दोन खानांसोबत काम केलंय, फक्त सलमानसोबत नाहीत. त्यामुळे हे दोघे कधी एकत्र येतात का, याची चाहत्यांना मोठी उत्सुकता आहे.

सलमान खानचे अपकमिंग प्रोजेक्ट्स

सध्या चाहते सलमानच्या आगामी चित्रपटाची वाट पहात आहेत. वामशी पेडिपल्ली याचे दिग्दर्शक असून त्याचं नाव असून हा चित्रपट ॲक्शन ड्रामा असेल. अधिकृतपणे या चित्रपटाचं नाव अजून तरी जाहीर झालेलं नाही. पुढल्या वर्षी, 2027 साली हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीस येऊ शकतो.

Follow Us
धक्कादायक! पोटच्या मुलालाच इतकं मारलं की... श्रावण महिन्यात मांसाहार
धक्कादायक! पोटच्या मुलालाच इतकं मारलं की... श्रावण महिन्यात मांसाहार मागणाऱ्या लेकाला पालकांनीच संपवलं
यंदाही नारळी पौर्णिमेनिमित्त आदित्य ठाकरे वरळी कोळीवाड्यात
यंदाही नारळी पौर्णिमेनिमित्त आदित्य ठाकरे वरळी कोळीवाड्यात; सांस्कृतिक सोहळ्यांमध्ये सहभाग
MPSC पेपरफुटी प्रकरणावर फडणवीसांचा मोठा निर्णय, दोषींवर कठोर...
MPSC पेपरफुटी प्रकरणावर फडणवीसांचा मोठा निर्णय, दोषींवर कठोर कारवाईचे निर्देश
मोठी बातमी! अडीच वर्षांनंतर शिंदे गटाला मिळणार मुंबईचे महापौरपद?
मोठी बातमी! पहिल्या अडीच वर्षांनंतर शिंदे गटाला मिळणार मुंबईचे महापौरपद? थेट... नेमकं सत्य काय?
काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांचे पंतप्रधानांना पत्र; डिलिमिटेशन
काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांचे पंतप्रधानांना पत्र; डिलिमिटेशनबाबत मोठी अपडेट समोर
नेपाळच्या पूरस्थितीत अडकलेल्या भारतीयांसाठी शिवसेनेचे मदत पथक रवाना
नेपाळच्या पूरस्थितीत अडकलेल्या भारतीयांसाठी शिवसेनेचे मदत पथक रवाना
मराठी शिकण्यास रिक्षाचालकांना मुदतवाढ, सरनाईकांचा निर्णय...
Devendra Fadnavis : मराठी शिकण्यास रिक्षाचालकांना मुदतवाढ, सरनाईकांचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी फिरवला
पुन्हा हुंडाबळी; पिंपरी-चिंचवडमध्ये उच्चभ्रू कुटुंबातील विवाहितेचा...
पुन्हा हुंडाबळी; पिंपरी चिंचवडमध्ये उच्चभ्रु कुटुंबातील विवाहितेचा संशयास्पद मृत्यू, सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप
फडणवीस यांची रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठीसाठी एक वर्षाची मुदत वाढ
देवेंद्र फडणवीस यांची रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठीसाठी एक वर्षाची मुदतवाढ जाहीर
कोणत्याही गैरप्रकाराशी माझा संबंध नाही', अभिमन्यु पवार यांच्याकडून...
MPSC Paper Leak :कोणत्याही गैरप्रकाराशी माझा संबंध नाही', अभिमन्यु पवार यांच्याकडून भूमिका स्पष्ट