“मेरी शादी खतरे मे है”; आईच्या निधनाच्या 5 दिवसांनंतर राखी सावंतचा ड्रामा पाहून भडकले नेटकरी

वैवाहिक आयुष्यातील समस्यांमुळे डिप्रेशनचा सामना करतेय, असंही राखी म्हणाली. मात्र तिचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी वैतागले आहेत. राखीने पुन्हा नवीन ड्रामा सुरू केला, अशी तक्रार नेटकऱ्यांनी केली आहे.

मेरी शादी खतरे मे है; आईच्या निधनाच्या 5 दिवसांनंतर राखी सावंतचा ड्रामा पाहून भडकले नेटकरी
Rakhi SawantImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Feb 01, 2023 | 6:57 PM

मुंबई: आईच्या निधनानंतर पाच दिवसांनी अभिनेत्री राखी सावंतचा नवीन व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. या व्हिडीओमध्ये ती ढसाढसा रडताना दिसतेय. मेरी शादी खतरे मे है, असं म्हणत ती पापाराझींसमोर जोरात हंबरडा फोडते. वैवाहिक आयुष्यातील समस्यांमुळे डिप्रेशनचा सामना करतेय, असंही राखी म्हणाली. मात्र तिचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी वैतागले आहेत. राखीने पुन्हा नवीन ड्रामा सुरू केला, अशी तक्रार नेटकऱ्यांनी केली आहे.

राखीने काही दिवसांपूर्वी खुलासा केला होता की तिने बॉयफ्रेंड आदिल खान दुर्रानीशी लग्न केलं आहे. या लग्नाचे फोटोसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता आईच्या निधनानंतर तिचा नवीन व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, ‘दररोज मीडियासमोर तमाशा करून ही दमत नाही का?’

हे सुद्धा वाचा

‘राखीचा नवीन ड्रामा सुरू झाला’, असं एका युजरने लिहिलं. तर ‘कृपया नवीन विषय घेऊन ये, आता आम्हाला हे काही मनोरंजक वाटत नाहीये’, असं दुसऱ्याने म्हटलं आहे.

राखी आणि आदिलच्या लग्नाचे फोटो जेव्हा सोशल मीडियावर व्हायरल झाले तेव्हा आदिलने राखीसोबतचं हे लग्न स्वीकारण्यास साफ नकार दिला होता. अशातच राखी मीडियासमोर ढसाढसा रडताना दिसली होती. तिने आदिलवर फसवणुकीचा आरोपदेखील केला होता. आदिलशी लग्न करण्यासाठी राखीने धर्म परिवर्तन केलं आहे. राखीने तिचं नाव बदलून ‘फातिमा’ असं ठेवलं. काही दिवसांनंतर आदिलनेही या लग्नाविषयी खुलासा केला आणि राखीचा पत्नी म्हणून स्वीकार केला.

पापाराझींसमोर राखी नेहमीच कोणता ना कोणता ड्रामा घेऊन येते. त्यामुळे तिचा हा नवीन व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरीसुद्धा वैतागले आहेत. राखीच्या या व्हिडीओमागे नेमकं सत्य काय आहे, हे मात्र राखीच सांगू शकते.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.