सर्व महिलांनी एग्स फ्रीज करायला हवेत कारण…, राम चरण याच्या पत्नीचं मोठं वक्तव्य

Ram Charan Wife Upasana | झगमगत्या विश्वात अनेक अभिनेत्रींनी केलेत स्वतःचे एग्स फ्रीज... अभिनेता राम चरण याची पत्नी उपासना हिने देखील एग्ज फ्रीज करत लग्नाच्या 11 वर्षांनंतर दिला मुलीला जन्म... अशात राम चरणच्या पत्नीने सर्व महिलांना का दिला एग्स फ्रीज करण्याचा सल्ला...

सर्व महिलांनी एग्स फ्रीज करायला हवेत कारण..., राम चरण याच्या पत्नीचं मोठं वक्तव्य
Follow us
| Updated on: Mar 08, 2024 | 10:26 AM

मुंबई | 8 मार्च 2024 : आतापर्यंत अनेक अभिनेत्रींनी भविष्यात आई होण्यासाठी स्वतःचे एग्स फ्रीज केले आहेत. दाक्षिणात्या अभिनेता राम चरण याची पत्नी उपासना हिने देखील स्वतःचे एग्स फ्रीज करुन ठेवले होते. सांगायचं झालं तर, उपासना कामिनेनी कोनिडेला हिची ओळख फक्त राम चरण याची पत्नी नाहीतर, प्रसिद्ध उद्योजक म्हणून देखील आहे. उपासना मॉर्डन विश्वातील आत्मविश्वासू उद्योजिका आहे. शिवाय तिच्या स्पष्ट वक्तव्यामुळे देखील ती कायम चर्चेत असते. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत उपासना हिने स्टारडम आणि स्वतःबद्दल अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर केल्या…

उपासना म्हणाली, ‘एक आई असल्यामुळे प्रॉडक्टिव्ह काम करणं माझ्यासाठी आव्हानात्मक आहे. पण मी माझं बेस्ट देत आहे आणि मला माहिती आहे मला काय करायचं आहे. मी मॅटरनिटी लीव्हवर असताना देखील अनेक कंपन्यांसोबत काम करत आहे. याठिकाणी मला महिलांना एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे स्वतःचे एग्स फ्रीज करुन ठेवा.’

‘जर तुम्ही एग्स फ्रीज केले असतील तर तुम्ही कधीही मातृत्वाचा अनुभव घेऊ शकता. मला असं वाटतं जेव्हा तुम्ही यशाच्या शिखरावर पोहोचता तेव्हाच आई होण्यााचा निर्णय घ्यायला हवा… जर तुम्ही करियरला दुसरं स्थान दिल्यानंतर बाळाला जन्म देण्याचा विचार करत असाल तर, तुम्हाला कायम पॉकेट मनीच्या आधारावर जगावं लागेल…’

हे सुद्धा वाचा

पुढे अभिनेत्याची पत्नी म्हणाली, ‘मी माझे एग्ज फ्रीज केले होते. आज मी गर्वाने सांगेल मला आणि रामला खूप चांगलं वाटत आहे. कारण आम्हाला वाटलं तेव्हा आम्ही बाळाला जन्म देण्याचा विचार केला.’ सांगायचं झालं तर, गेल्या वर्षी राम चरण आणि उपासना यांच्या घरात चिमुकलीचं स्वागत झालं. त्यांच्या मुलीचं नाव कलिन कारा कोनिजेला असं आहे.

मुलीचा जन्म झाल्यानंतर अभिनेत्या सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत आनंद व्यक्त केला. सोशल मीडियावर अभिनेत्याची पोस्ट तुफान व्हायरल झाली. राम चरण फक्त अभिनेता नाहीतर, उद्योजक देखील आहे. राम चरण कुटुंबासोबत रॉयल आयुष्य जगतो..

राम चरण याने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. अभिनेत्याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. अभिनेता सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असतो. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेता कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतो.

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.