‘संपूर्ण देश तुम्हाला देव मानतो आणि तुम्ही..’, दीपिका चिखलिया यांचा पतीसोबतच्या ‘अशा’ व्हिडीओवर चाहत्यांकडून संताप व्यक्त

Dipika Chikhlia : 'रामायण' फेम दीपिका चिखलिया यांच्या नको त्या व्हिडीओवर चाहत्यांकडून संताप व्यक्त, 'तो' व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल... सोशल मीडियावर फक्त आणि फक्त दीपिका चिखलिया यांच्या खासगी व्हिडीओची चर्चा

'संपूर्ण देश तुम्हाला देव मानतो आणि तुम्ही..', दीपिका चिखलिया यांचा पतीसोबतच्या 'अशा' व्हिडीओवर चाहत्यांकडून संताप व्यक्त
Follow us
| Updated on: Nov 24, 2023 | 12:35 PM

मुंबई | 24 नोव्हेंबर 2023 : अभिनेत्री दीपिका चिखलिया आता झगमगत्या विश्वापासून दूर असल्या तरी त्यांच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. ‘रामायण’ मालिकेत ‘सीता’ या भूमिकेला न्याय दिल्यामुळे त्यांच्या चाहत्यांची संख्या आज देखील फार मोठी आहे. ‘रामायण’ मालिकेला संपून आज अनेक वर्ष झाली आहेत. पण कोणीही मालिका आणि दीपिका यांना विसरु शकलेलं नाही. सांगायचं झालं तर दीपिका चिखलिया आता अभिनय क्षेत्रात सक्रिय नसल्या तरी, सोशल मीडियावर त्या कायम सक्रिय असतात. सोशल मीडियावर देखील त्यांच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी दीपिका चिखलिया कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतात.

आता देखील दीपिका यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. दीपिका यांनी लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पती हेमंत टोपीवाला यांच्यासोबत एक खासगी व्हिडीओ पोस्ट केला. ज्यामुळे दीपिका चिखलिया यांच्या चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे.

दीपिका चिखलिया यांचा पतीसोबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ पोस्ट करत दीपिका यांनी कॅप्शनमध्ये ‘मझ्यासाठी एकच महत्त्वाची गोष्ट म्हणजे, तुम्ही माझ्या आयुष्यातील भक्कम आधार आहात.. तुम्ही माझ्या आयुष्यात आहात म्हणून मी स्वतःला धन्य समजते..’ असं दीपिका चिखलिया म्हणाल्या आहेत…

दीपिका चिखलिया यांचा व्हिडीओ काही चाहत्यांना आवडला आहे. तर काही नेटकऱ्यांनी मात्र संताप व्यक्त केला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त दीपिका चिखलिया यांच्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे. नेटकरी कमेंटच्या माध्यमातून निराशा व्यक्त करत आहेत..

दीपिका चिखलिया यांचा पतीसोबत व्हिडीओ पाहिल्यानंतर एक चाहता म्हणाला, ‘सीता माता तुम्ही असे व्हिडीओ नका बनवू…’ दुसरा नेटकरी म्हणाला ‘तुम्ही अशा पोज नका देऊ तुम्हाला पूर्ण भारत पाहात आहे..’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘तुम्हाला असं नाही पाहू शकत कारण तुम्हाला देवीचा दर्ज दिला आहे…’ सोशल मीडियावर फक्त आणि फक्त दीपिका चिखलिया आणि त्यांच्या पत्नीची चर्चा रंगली आहे..

दीपिका चिखलिया यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, सोशल मीडियावर दीपिका चिखलिया कायम सक्रिय असतात. सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी दीपिका चिखलिया कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असतात. पण खासगी आयुष्यातील फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केल्यामुळे त्यांना ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागतो.

या 40 गद्दारांचा सूड आपल्याला घ्यायचा आहे, संजय राऊत यांचे आव्हान
या 40 गद्दारांचा सूड आपल्याला घ्यायचा आहे, संजय राऊत यांचे आव्हान.
नशीब मोदी येणार म्हणून बाप्पाला पुढची तारीख दिली नाही - उद्धव ठाकरे
नशीब मोदी येणार म्हणून बाप्पाला पुढची तारीख दिली नाही - उद्धव ठाकरे.
'...तोपर्यंत मुख्यमंत्री पदावर...,' केजरीवाल यांनी काय केली घोषणा
'...तोपर्यंत मुख्यमंत्री पदावर...,' केजरीवाल यांनी काय केली घोषणा.
मला पंतप्रधान पदाची ऑफर होती, परंतू...काय म्हणाले गडकरी
मला पंतप्रधान पदाची ऑफर होती, परंतू...काय म्हणाले गडकरी.
लाडकी बहिण योजनेवरुन शरद पवार यांचा राज्य सरकारला टोला, म्हणाले की...
लाडकी बहिण योजनेवरुन शरद पवार यांचा राज्य सरकारला टोला, म्हणाले की....
आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?
आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?.
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?.
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ.
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?.
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल.