AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sunil Lahri: भावनेच्या भरात चूक झाली.., ‘रामायण’ फेम सुनील लहरी यांनी मागितली माफी; राखीच्या व्हिडीओवरून वाद

Sunil Lahri: 'रामायण' मालिकेतील अभिनेते सुनील लहरी यांनी रक्षाबंधनच्या दिवशी शेअर केलेल्या एका व्हिडीओबद्दल माफी मागितली आहे. या व्हिडीओमध्ये एक मुलगी त्यांना आपला भाऊ समजून राखी बांधताना दिसतेय.

Sunil Lahri: भावनेच्या भरात चूक झाली.., 'रामायण' फेम सुनील लहरी यांनी मागितली माफी; राखीच्या व्हिडीओवरून वाद
सुनील लहरीImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 03, 2026 | 1:40 PM
Share

Sunil Lahri: ‘रामायण’ या लोकप्रिय मालिकेत लक्ष्मणाची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेले अभिनेते सुनील लहरी सध्या त्यांच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आहेत. रक्षाबंधनाच्या दिवशी शेअर केलेल्या एका व्हिडीओवरून त्यांच्यावर टीका झाली. या टीकेनंतर सुनील लहरी यांनी स्वतः एक व्हिडीओ शेअर करत झालेल्या प्रकाराबद्दल माफी मागितली आहे. ‘भावनेच्या भरात चूक झाली’, असं म्हणत त्यांनी आपली बाजू स्पष्ट केली.

रक्षाबंधनाच्या व्हिडीओत नेमकं काय होतं?

रक्षाबंधनाच्या निमित्ताने सुनील लहरी यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. यामध्ये एका मुलीने त्यांना राखी बांधली होती. ही मुलगी अनेक वर्षांपासून फळं विकण्याचं काम करते आणि तिला भाऊ नसल्याचं सुनील यांनी सांगितलं होतं. त्यामुळे तिने त्यांना भाऊ मानून राखी बांधण्याची इच्छा व्यक्त केली होती. व्हिडीओमध्ये ती मुलगी सुनील लहरी यांचे पाय स्पर्श करून त्यांचा आशीर्वाद घेताना दिसली. त्यानंतर त्यांनी तिला शगुन म्हणून पैसे दिले. सुनील यांचा उद्देश या माध्यमातून माणुसकीचा आणि भावाबहिणीच्या नात्याचा संदेश देण्याचा होता. मात्र, व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. काहींनी त्यांच्या या कृतीचं कौतुक केलं, तर काही नेटकऱ्यांनी व्हिडीओवर प्रश्न उपस्थित केले.

पहा व्हिडीओ-

या व्हिडीओतील आणखी एका गोष्टीकडे नेटकऱ्यांचं लक्ष गेलं. राखी डाव्या हातावर बांधण्यात आल्याने काही लोकांनी सुनील लहरींवर टीका केली. सामान्यतः रक्षाबंधनाच्या दिवशी राखी उजव्या हातावर बांधण्याची प्रथा असल्याचं सांगत अनेकांनी कमेंट्स केल्या. या प्रतिक्रियांनंतर सुनील लहरी यांनी स्पष्टीकरण देण्याचा निर्णय घेतला. वाद वाढल्यानंतर सुनील लहरी यांनी एक्सवर एक नवीन व्हिडीओ शेअर केला. यात त्यांनी कबूल केलं की, भावनेच्या भरात काही चुका होऊ शकतात. त्या मुलीची परिस्थिती पाहून आपण भावूक झालो होतो, असं त्यांनी सांगितलं. लहानपणीच आई-वडिलांना गमावलेल्या आणि भाऊ नसलेल्या एका मुलीने आपल्याला भाऊ मानून राखी बांधल्यामुळे आपण भावनाविवश झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

सुनील लहरी सोशल मीडियावर सक्रिय असून विविध सामाजिक आणि समकालीन मुद्द्यांवर आपली मतं व्यक्त करताना दिसतात. ‘रामायण’मधील लक्ष्मणाच्या भूमिकेमुळे सुनील लहरी आजही प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान राखून आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक सोशल मीडिया पोस्टकडे चाहत्यांचं आणि नेटकऱ्यांचं लक्ष असतं.

Follow Us
आवरा हे गुंड! विद्यानंद बापटांच्या मारहाणीवर सुप्रिया सुळे आक्रमक
आवरा हे गुंड! विद्यानंद बापटांच्या मारहाणीवर सुप्रिया सुळे आक्रमक, म्हणाल्या...
मला आधी त्याच्या दोन वाजवू द्या… DJच्या वादातून बापटांवर हल्ला
मला आधी त्याच्या दोन वाजवू द्या… DJच्या वादातून विद्यानंद बापटांवर हल्ला; tv9 मराठीच्या कॅमेरा समोरच राडा
पुण्यात DJविरोधक विद्यानंद बापट यांना मारहाण! tv9 मराठीशी बोलत असताना
Pune | पुण्यात DJविरोधक विद्यानंद बापट यांना मारहाण! tv9 मराठीशी बोलत असतानाच तरुणाने केला हल्ला
मराठा आंदोलनात धक्कादायक घटना! अंतरवाली सराटीत आंदोलकाने जीव गमावला
Maratha Andolan Jalna | मराठा आंदोलनात धक्कादायक घटना! अंतरवाली सराटीत आंदोलकाने जीव गमावला; नेमकं घडलं काय?
संघाला देवेंद्र फडणवीसांना उपपंतप्रधान करायचंय संजय राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut | फडणवीसांच्या दिल्लीवारीची चर्चा पुन्हा रंगली! संघाला त्यांना उपपंतप्रधान करायचंय राऊतांचा मोठा दावा
विखे पाटलांचा पवारांना अप्रत्यक्ष टोला; 1994चं पाप…
Vikhe Patil | विखे पाटलांचा शरद पवारांना अप्रत्यक्ष टोला; 1994चं पाप… म्हणताच पवारांचा सत्तेत असल्याची आठवण करून पलटवार
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या निकालावर पवारांचं मौन! सुनावणी संपलेली नाही...
Sharad Pawar | शिवसेना पक्ष-चिन्हाच्या निकालावर पवारांचं मौन! सुनावणी संपलेली नाही, त्याआधी...
ठाकरे सेनेला मुंबईत धक्का! विशाखा राऊतांच्या नगरसेवकपदावर टांगती तलवार
Vishakha Raut | ठाकरे सेनेला मुंबईत मोठा धक्का! विशाखा राऊतांची याचिका हायकोर्टाने फेटाळली; थेट नगरसेवकपदावरच टांगती तलवार
शिल्पा गवारे यांच्या शोकसभेत उपमहापौर हसल्या; VIDEO होतोय व्हायरल
एका बाजूला शिल्पा गवारे यांना श्रद्धांजली, दुसरीकडे उपमहापौर हसताना दिसल्या; VIDEO होतोय व्हायरल
जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस! शिष्टमंडळाची आज पुन्हा भेट
Manoj Jarange Patil | जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस! सरकारच्या शिष्टमंडळाची आज पुन्हा भेट, चर्चेकडे महाराष्ट्राचं लक्ष