
दक्षिणेकडील जबरदस्त अभिनेत्री साई पल्लव तिच्या हास्यामुळे, नो मेकअप लूक आणि सौंदर्यामुळे खूप प्रसिद्ध आहे. दक्षिण चित्रपटसृष्टी गाजवणारी ही अभिनेत्री लवकरच हिंदीतही दिसणार असून बहुचर्चित ‘रामायण’ चित्रपटात ती सीता मातेची भूमिका साकारत, रणबीर कपूर सोबत झळकणार आहे. पुढल्या वर्षी रिलीज होणाऱ्या या चित्रपटाबद्दल लोकांच्या मनात प्रचंड उत्सुकता असून तगडी स्टारकारस्ट, उत्तम म्युझिक आणि परफॉर्मन्स पाहण्यास सगळेच आतूर आहेत. मात्र याच चित्रपटातील प्रमुख अभिनेत्री असलेली साई पल्लवी सध्या बरीच चर्चेत आहे.
खरंतर साई पल्लवी आणि तिची बहीण पूजाज, या दोघी नुकत्याच सुट्टीसाठी बाहेर गेल्या होत्या, सर्वांप्रमाणेच त्यांनीही या सुट्टीचे, मजेचे काही फोटो शेअर केले. स्विमसूट घालून, समुद्रकिनाऱ्यावर बसलेल्या दोन्ही बहिणी मस्त हसताना दिसल्या. पण हेच फोटो आता वादात सापडले आहेत. कारण सोशल मीडियावर यामुळे बराच गोंधळ आहे. अनेक लोकांनी साई पल्लवीला भलं-बुरं ऐकवत तिला ट्रोल केलं आहे.
नेमकं काय झालं ?
साई पल्लवीची बहीण पूजाने त्यांच्या सुट्टीचे काही फोटो शेअर केले होतेके, Beach high #sunkissed अशी कॅप्शन लिहीत आणि साईपल्लवीला टॅग करत तिने त्या दोघींनी केलेली मजा, त्यांचे काही फोटो शेअर केले. बघता बघता ते फोटो वेगाने व्हायरल झाले. या फोटोंमध्ये पूजा आणि साई पल्लवी दोघीही बीचवर, स्विमसूटमध्ये दिसल्या. मात्र ते पाहून अनेकांनी खोचक कमेंट्स करत टीका करण्यास सुरूवात केली. ” पडद्यावर इतकी पारंपारिक आहे, ती साई पल्लवी खऱ्या आयुष्यात बिकिनी घालते.” अशी कमेंट एकमाने केली. तर दुसऱ्याने तिले थेट इतरांच्या पंक्तीतच बसवलं “यावरून सिद्ध होतं की ती, इतर प्रत्येक नायिकेसारखीच आहे…” असं त्याने लिहीलं. ‘जर साई पल्लवी स्लीव्हलेस आणि शॉर्ट ड्रेस घालून समुद्रकिनाऱ्यावर गेली तर कोणती नायिका आपल्या भारतीय संस्कृतीचे रक्षण करेल?’ अशी कमेंट तिसऱ्या यूजरने केली.
चाहत्यांनी केला बचाव
एकंदरच साई पल्लवीचे हे मॉडर्न रूप आणि कपडे लोकांना फार आवडले नाहीत. अनेकांनी तर ‘रामायण’ चित्रपटातील तिच्या कास्टिंगबद्दलही प्रश्न उपस्थित केला. तिचं ट्रोलिंग वाढतंच गेलं. पण ते पाहू साई पल्लवीचे चाहते बचावासाठी मैदानात उतरले.” काय घालायचे, ही पल्लवीची इच्छा, निवड आहे. तिने पाण्याखाली काय घालावे अशी तुमची अपेक्षा आहे? साडी???” असा सावल एकाने विचारला. तर स्वीमिंग करताना लोकं तर स्विमसूटच घालतात, ज्यांमध्ये लोकांना कम्फर्टेूल वाटतं, तेच ते घातलीत, दुसऱ्यांच्या जीवनात दखल देणं बंद करा, अशी कमेंट दुसऱ्याने करत साई पल्लवीचा बचाव केला.
‘रामायण’ चा पहिला लूक
साई पल्लवी ही लवकरच रणबीर कपूरसोबत “रामायण” मध्ये दिसणार आहे. अलिकडेच, निर्मात्यांनी या महाकाव्याचा पहिला लूक रिलीज केला आणि त्यामुळे लोकांमध्ये उत्साह निर्माण झाला. 3 जुलै 2025 रोजी, निर्मात्यांनी ‘रामायण: द इंट्रोडक्शन’ या चित्रपटाच्या लाँचिंगसह महाकाव्य विश्वाचे प्रदर्शन केले, ज्यामध्ये पौराणिक कथांमधील दोन सर्वात प्रतिष्ठित शक्ती: राम आणि रावण यांचा समावेश आहे.