
अभिनेत्री आलिया भट्ट – अभिनेता रणबीर कपूर यांची लेक राहा कपूर प्रसिद्ध आणि लोकप्रिय स्टारकिड्सच्या यादीत अव्वल स्थानी आहे. राहा हिला कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी पापाराझी कायम उत्सुक असतात. तर चाहते देखील राहा हिला पाहण्यासाठी उत्सुक असतात. आता देखील राहा हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये राहा काका अयान मुखर्जी याच्यासोबत फिरताना दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त अयान मुखर्जी आणि राहा कपूर यांच्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे.
अयान मुखर्जी आणि राहा हिचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. राहा हिला कडेवर घेऊन अयान मुंबईतील वांद्रे भागातील एका कॅफेबाहेर पोहोचला. राहा हिच्या हातात एक पाकीटही दिसत आहे. यासोबत खेळताना राहा चे एक्सप्रेशन लोकांची मने जिंकणारे आहेत.
राहा हिच्या व्हिडीओवर एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘राहा पूर्णपणे आलिया हिची कार्बन कॉपी आहे.’, दुसरा नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘राहा ऋषी कपूर यांची कार्बन कॉपी आहे…’, राहा हिच्या व्हिडीओवर नेटकरी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत प्रेम व्यक्त करत आहेत.
राहा कपूर हिचा जन्म 6 नोव्हेंबर 2022 मध्ये झाला. आलिया भट्ट हिने सोनोग्राफीचा एक फोटो पोस्ट करत प्रग्नेंट असल्याची माहिती चाहत्यांना दिली होती. एवढंच नाहीतर, 25 डिसेंबर 2023 मध्ये आलिया आणि रणबीर यांनी लेकीचा चेहरा संपूर्ण जगाला दाखवला. त्यानंतर अनेकदा राहा हिला कुटुंबियासोबत स्पॉट करण्यात आलं.
आलिया भट्ट – रणबीर कपूर यांच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, रणबीर कपूर लवकरच ‘रामायण’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. ‘लव्ब एन्ड वॉर’ मध्ये देखील रणबीर मुख्य भूमिकेत झळकणार आहे. आलिया हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, ‘जिगरा’ सिनेमात अभिनेत्री दिसणार आहे.