AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tu Jhoothi Main Makkar : दोन दिवसांमध्ये रणबीर – श्रद्धा यांच्या सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर बोलबाला

शाहरुख खान स्टारर 'पठाण' सिनेमानंतर बॉक्स ऑफिसवर रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर 'तू झूठी मैं मक्कार' सिनेमा रचतोय नवीन विक्रम; दोन दिवसांत सिनेमाने केली दमदार कमाई

Tu Jhoothi Main Makkar : दोन दिवसांमध्ये रणबीर - श्रद्धा यांच्या सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर बोलबाला
| Updated on: Mar 10, 2023 | 11:23 AM
Share

Tu Jhoothi Main Makkar Box Office day 2 : यंदाच्या वर्षातील होळी अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर हिच्यासाठी खास ठरली आहे. कारण सध्या सर्वत्र रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर स्टारर ‘तू झूठी मैं मक्कार’ सिनेमाची चर्चा रंगत आहे. ८ मार्च रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झालेला सिनेमा आता बॉक्स ऑफिसवर नवीन विक्रम रचताना दिसत आहे. दिग्दर्शक लव रंजन दिग्दर्शित ‘तू झूठी मैं मक्कार’ सिनेमाने दोन दिवसांत बॉक्स ऑफिसवर मोठी मजल मारली आहे. सध्या बॉक्स ऑफिसवर ‘तू झूठी मैं मक्कार’ सिनेमाता बोलबाला दिसत आहे. सध्या सर्वत्र ‘तू झूठी मैं मक्कार’ सिनेमाची चर्चा आहे.

रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर स्टारर ‘तू झूठी, मैं मक्कार’ सिनेमा बुधवारी प्रदर्शित झाला. सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर विश्लेषकांपासून चाहत्यांपर्यंत सर्वांनी सिनेमाचं कौतुक केलं आहे. सिनेमातील श्रद्धा आणि रणबीर यांच्यातील रोमांटिक केमिस्ट्री आणि विनोद प्रेक्षकांच्या पसंतीस पडताना दिसत आहे. सिनेमाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी १५.७३ कोटी रुपयांचा गल्ला जमा केला.

महत्त्वाचं म्हणजे दुसऱ्या दिवशी सुट्टी नसतानाही बॉक्स ऑफिसवर सिनेमाने मोठी कमाई केली. दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी सिनेमाने जवळपास १० कोटी रुपयांपर्यंत मजल मारली. म्हणजे रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर स्टारर ‘तू झूठी, मैं मक्कार’ सिनेमाने प्रदर्शनानंतर जवळपास २५.७३ कोटी रुपयांची कमाई केली आहे. सध्या सर्वत्र सिनेमाची चर्चा आहे. त्यामुळे आता शनिवार आणि रविवार आसल्यामुळे सिनेमा किती कोटी रुपयांपर्यंत मजल मारेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सिनेमाचे दिग्दर्शक लव रंजन रोमांटिक सिनेमांसाठी ओळखले जातात. त्यांनी अभिनेता कार्तिक याच्या करियरला चांगलं वळण दिलं आहे. ‘प्यार का पंचनामा’ आणि ‘सोनू के टीटू की स्वीटी’ सिनेमामुळे कार्तिकची लोकप्रियता देखील प्रचंड वाढली. ‘तू झूठी, मैं मक्कार’ सिनेमात रणबीर मुख्य भूमिकेत आहे, पण कार्तिक आर्यन याच्या पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेला अधिक प्रेम मिळेत आहे.

‘तू झूठी, मैं मक्कार’ सिनेमात रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांच्यासोबत डिंपल कपाडिया, बोनी कपूर, हसलीन कौर, राजेस जैस, आयशा राजा मिश्रा या सेलिब्रिटींची देखील महत्त्वाची भूमिका आहे. ‘तू झूठी, मैं मक्कार’ सिनेमानंतर रणबीर नॅशनल क्रश रश्मिका मंदाना हिच्यासोबत ‘एनिमल’ सिनेमात दिसणार आहे. त्यामुळे रणबीर आणि रश्मिका यांची रिल लाईफ जोडी प्रेक्षकांना आवडते का? हे पाहण महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?