Ramayana Trailer : रणबीर कपूरच्या ‘रामायण’ सिनेमाला मोठा फटका, प्रदर्शनापूर्वीच ट्रेलर लीक, भव्य सेटची झलक समोर…

Ramayana Trailer : अभिनेता रणबीर कपूर, यश आणि अभिनेत्री साई पल्लवी स्टारर 'रामायण' सिनेमाचा ट्रेलर 24 जुलै रोजी प्रदर्शित होणार होता. पण काही कारणांमुळे सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यापासून रोखण्यात आला. मात्र प्रदर्शनापूर्वीच सिनेमाचा ट्रेलर लीक झाला आहे...

Ramayana Trailer : रणबीर कपूरच्या रामायण सिनेमाला मोठा फटका, प्रदर्शनापूर्वीच ट्रेलर लीक, भव्य सेटची झलक समोर...
रामायण सिनेमा
| Updated on: Jul 26, 2026 | 8:10 AM

Ramayana Trailer : गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या पडद्यावर एकापेक्षा एक सिनेमे प्रदर्शित होत आहेत. ‘छावा’, ‘धुरंधर’ सिनेमाचे दोन भाग, ‘राजा शिवाजी’, ‘देऊळ बंद 2’ या सिनेमांनंतर चाहते अभिनेता रणबीर कपूर स्टारर ‘रामायण’ सिनेमाच्या प्रतिक्षेत आहे. सिनेमाचा ट्रेलर ठरल्यानुसार 24 जुलै रोजी प्रदर्शित होणार होता, पण काही कारणांमुळे सिनेमा प्रदर्शित होऊ शकला नाही. निर्मात्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत नवीन तारखेची लवकरच घोषणा करु… अशी घोषणा केलेली. पण नव्या तारखेची घोषणा करण्यापूर्वीच सिनेमाचा ट्रेलर लीक झाला आहे. सध्या ट्रेलर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये राम आणि रावणाची झलक पाहायला मिळत आहे.

सांगायचं झालं, ‘रामायण’ सिनेमाची उत्सुकता तेव्हा शिगेला पोहोचली, जेव्हा दिल्ली येथे पहिला ट्रेलर लॉन्च सोहळा पार पडला. तर काही ठरावीक लोकांनी सिनेमाचा ट्रेलर पाहण्याची संधी मिळाली. पण काही लोकांकडून प्रतिक्षा करणं शक्य झालं नाही, ज्यामुळे दिल्लीत पाहिलेला ट्रेलर त्यांनी सोशल मीडियावर लीक केला. पण समोर आलेल्या माहितीनुसार, लीक झालेला ट्रेलर पूर्ण नसून अर्धाच आहे. त्यामुळे संपूर्ण ट्रेलर पाहण्यासाठी अद्यापही काही काळ प्रतिक्षा करावी लागणार आहे.

 

 

ट्रेलरमध्ये यशला पहिल्यांदाच रावणाच्या भूमिकेत पाहता येत आहे. यात एक युद्धप्रसंग आहे जिथे रावण एकाच प्रहाराने भगवान इंद्राचा हत्ती, ऐरावत याला खाली पाडतो. यश एका भव्य अवतारात दिसतो, जो त्याला अगदी साजेसा वाटतो. रावणाच्या एन्ट्रीनंतर, रणबीरचे राम म्हणून आगमन होतं. त्यानंतर लगेचच, साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत दिसते. ट्रेलरच्या शेवटी, रकुल प्रीत सिंग शूर्पणखेच्या भूमिकेत दिसते; जंगलात लक्ष्मण तिचं नाक कापतो.

एवढंच नाही तरस ट्रेलरमध्ये राम आणि सीता यांचं स्वयंवर देखील दाखवण्यात आलं आहे. ज्यामध्ये श्री राम पिनाक धनुष्य उचलताना दिसत आहे. भव्य असा हा ट्रेलर आहे. पण क्लालिटी काही चांगली नाही. त्यामुळे निर्माते आता कधी ट्रेलर प्रदर्शित करतात याच प्रतिक्षेत प्रेक्षक आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us