AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘अंकल बहुत लकी हैं’, रणबीर कपूर याने गार्डला दिली अशी वागणूक, व्हिडीओ पाहून म्हणाल…

Ranbir Kapoor : 'ॲनिमल' सिनेमात भयानक दिसणार रणबीर कपूर खऱ्या आयुष्यात आहे तरी कसा? अभिनेत्याने गार्डला दिलेली वागणूक पाहून म्हणाल..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त रणबीर कपूर याच्या व्हायरल व्हिडीओची चर्चा...

'अंकल बहुत लकी हैं', रणबीर कपूर याने गार्डला दिली अशी वागणूक, व्हिडीओ पाहून म्हणाल...
| Updated on: Jan 29, 2024 | 12:07 PM
Share

मुंबई | 29 जानेवारी 2024 : अभिनेता रणबीर कपूर याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. अभिनेत्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. ‘ॲनिमल’ सिनेमात दमदार भूमिका साकारल्यानंतर रणबीर याच्या लोकप्रियतेत आणि प्रसिद्धीमध्ये मोठी वाढ झाली आहे. रणबीर फक्त त्याच्या खासगी आयुष्यामुळे नाही प्रोफेशनल आयुष्यामुळे देखील चाहत्यांमध्ये चर्चेत असतो. एवढंच नाही तर, त्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. आता देखील अभिनेत्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये रणबीर याने गार्डला दिलेली वागणूक चाहत्यांना फार आवडली आहे. त्यामुळे सर्वत्र रणबीर याचं कौतुक होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये रणबीर बाहेर जाताना दिसत आहे. अभिनेता कारमधून उतरल्यानंतर त्याचे फोटो काढण्यासाठी पापाराझींनी गर्दी केली.

पापाराझी अभिनेत्याचे फोटो क्लिक करत असताना, एक गार्ड त्याठिकाणी उभे होते. तेव्हा पापाराझींनी गार्डला बाजूला होण्यास सांगितलं. तेव्हा रणबीर याने गार्डला जवळ घेत पापाराझींना पोज दिल्या. सध्या रणबीर कपूर याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

व्हिडीओवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. एक नेटकरी व्हिडीओवर कमेंट करत म्हणाला, ‘रणबीर प्रचंड क्यूट आणि स्वीट आहे..’ तर दुसरा नेटकरी म्हणाला, ‘काका प्रचंड लकी आहेत..’ तर अनेक नेटकऱ्यांनी रणबीर कपूर याच्या स्वभावाचं कौतुक केलं आहे.

रणबीर याचे आगामा सिनेमे…

रणबीर कपूर याच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, ‘ॲनिमल’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तुफान कामगिरी केली. आता अभिनेता ‘रामायण’ सिनेमामुळे चर्चेत आहे. चाहते देखील ‘रामायण’ सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार रणबीर सिनेमात प्रभू राम यांच्या भूमिकेत दिसेल.

खासगी आयुष्यामुळे देखील रणबीर कपूर कायम चर्चेत असतो. अभिनेत्री आलिया भट्ट हिच्यासोबत लग्न झाल्यानंतर अभिनेत्याने लेकीचं मोठ्या आनंदात स्वागत केलं. आलिया – रणबीर यांच्या लेकीचं नाव राहा कपूर असं आहे. राहा हिचे देखील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात.

Follow Us
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा