Love And War : ‘ तो रुबाब, तो दरारा…’ ‘लव्ह अँड वॉर’मधील रणबीरचा फर्स्ट लूक चर्चेत
Love And War : संजय लीला भन्साळी यांनी चाहत्यांना मोठं सरप्राईज दिलं आहे. 'लव्ह अँड वॉर' चित्रपटामधील रणबीरचा पहिला लूक समोर आला असून त्यावर चाहत्यांच्या विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत.

Love And War : प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांच्या बहुचर्चित, बहुप्रतिक्षित ‘लव्ह अँड वॉर’ चित्रपटाबद्दल चाहत्यांना बऱ्याच काळापासून उत्सुकता आहे. आता मेकर्सनी मोठं पाऊल उचलत रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) पहिला लूक रिलीज करून चाहत्यांना मोठ सरप्राईज दिलं आहे. रणबीरचा हा नवा आणि ढासू अंदाज सोशल मीडियावर येताच प्रचंड व्हायरल झाला. समोर आलेल्या या नव्या पोस्टरमध्ये रणबीर खूप इंटेन्स आणि डॅशिंग लूकमध्ये दिसतोय. तो एका व्हिंटेज निळ्या रंहाच्या कन्व्हर्टेबल कारमध्ये बसला असून डोळ्यांवर गॉगल, असा त्याचा अंदाज दिसतोय. या चित्रपटात रणबीरशिवाय आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि विकी कौशल (vicky Kaushal) यांच्याही प्रमुख भूमिका आहेत, मात्र अद्या त्यांचा फर्स्ट लूक जारी रिलीज झालेला नाही.
‘लव्ह अँड वॉर’चं जे नवं पोस्टर जारी झालंय त्यात, रणबीर कपूरच्या हातावर रक्त आणि दुखापतीच्या बऱ्याच खोल खुणा दिसल्या आहेत. यावरून चित्रपटातील थ्रिल आणि ‘वॉर’चा पैलू अधोरेखित होताना दिसतो. त्याच्या लूकसोबत देण्यात आलेली कॅप्शनही चर्चेत आहे — “वो रुतबा, वो रौब, वो जुनून.” असं सोबत लिहीण्यात आलं आहे. हा बहुप्रतिक्षित चित्रपट पुढल्या वर्षी रिलीज होणार आहे.
‘लव्ह अँड वॉर’मधील रणबीरचा नवा लूक
रणबीर कपूरच्या नव्या लूकच्या पोस्टरमध्ये ‘लव्ह अँड वॉर’च्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली. संजय लीला भन्साळी यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेला हा चित्रपट 21 जानेवारी 2027 रोजी मोठ्या स्तरावर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘लव्ह अँड वॉर’मध्ये केवळ रणबीर कपूरच नाही, तर आलिया भट्ट आणि विकी कौशल हे देखील महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. रणबीर कपूरचा फर्स्ट लूक यापूर्वीच प्रदर्शित करण्यात आला आहे. आता चाहत्यांना आलिया भट्ट आणि विकी कौशल यांच्या लूकची उत्सुकता लागली आहे. दोघांचेही फर्स्ट लूक पोस्टर्स लवकरच समोर येण्याची शक्यता आहे.
एका बाजूला संजय लीला भन्साळी यांचं दिग्दर्शन आणि दुसऱ्या बाजूला रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि विकी कौशल यांचं दमदार कॉम्बिनेशन. सध्या तरी हा चित्रपट 2027 च्या सुरुवातीलाच बॉक्स ऑफिसवर मोठी चर्चा निर्माण करेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. रणबीर कपूर हा तर सोशल मीडियावर ॲक्टिव्ह नसतो, असं असलं तरी आलिया भट्ट आणि विकी कौशल यांनी त्याचं पोस्टर इन्स्टाग्रामवर शेअर करत चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे.
आधी ‘रामायण’ मध्ये दिसणार रणबीर
खरंत Love And War चित्रपटापूर्वी रणबीर कपूरचा बहुचर्चित ‘रामायण’ चित्रपट रिलीज होणार आहे. दिवाळीच्या आसपास हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्यानंतर नव्या वर्षात लव्ह अँड वॉर रिलीज होईल.